Polio vaccination  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात रविवारी 5 वर्षांखालील मुलांसाठी पोलिओ लसीकरण मोहीम

देशात पोलिओचा शेवटचा रुग्ण 2011 मध्ये हावडा, कलकत्ता येथे आढळून आला होता.

दैनिक गोमन्तक

पणजी: राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम अंतर्गत गोव्यात 27 फेब्रुवारी रोजी पाच वर्षांखालील मुलांना पोलिओ लसीचे डोस दिले जाणार आहेत. राज्य लसीकरण अधिकारी डॉ राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम गोव्यातील 667 केंद्रांवर होणार असून राज्य सरकारने (State Government) जवळपास 1,05,083 मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पाच वर्षांखालील सर्व मुलांना पोलिओ लसीचे दोन थेंब दिले जातील. (Polio vaccination drive in goa)

बोरकर पुढे म्हणाले की, देशात पोलिओचा शेवटचा रुग्ण 2011 मध्ये हावडा, कलकत्ता (Kolkata) येथे आढळून आला होता आणि 2014 मध्ये भारताला पोलिओमुक्त घोषित करण्यात आले होते.

काणकोणात काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे रविवारी पंचवीस केंद्रावर मुलांचे पल्स पोलिओ लसीकरण (Vaccination) करण्यात येणार आहे. शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना हा डोस देण्यात येणार आहे. या मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सामाजिक आरोग्य केंद्रच्या आरोग्याधिकारी डॉ.स्नेहा आमोणकर यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, काणकोण लायन्स क्लबचे पदाधिकारी व समाज कार्यकर्ते कार्यरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT