Sudesh Naik Dainik Gomantak
गोवा

Panaji Police : मोन्‍सेरात दाम्‍पत्‍याच्या अटकेसाठी पणजी पोलिस गेले होते घरी!

Panaji Police : पाेलिस स्‍थानक मोडतोड प्रकरण : सुदेश नाईक यांची उलटतपासणी

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Police : मडगाव, पणजी पोलिस स्‍थानकावर हल्‍ला करून पाेलिस स्‍थानकाची नासधूस केल्‍यानंतर बाबुश मोन्‍सेरात व जेनिफर मोन्‍सेरात या दोघांनाही अटक करण्‍यासाठी पणजी पाेलिस त्‍यांच्‍या ताळगाव येथील घरी गेले होते. पण ते दोघेही घरात न सापडल्‍याने त्‍यांना परत यावे लागले.

पणजीचे तत्‍कालीन पोलिस निरीक्षक आणि सध्‍याचे उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी त्‍यांच्‍या उलट तपासणीच्‍यावेळी न्‍यायालयाला ही माहिती दिली. १९ फेब्रुवारी २००८ रोजी पणजी पोलीस स्‍थानकावर बाबुश व त्‍यांच्‍या समर्थकांकडून हल्‍ला झाला होता. त्‍यात काही पोलिसही जखमी झाले होते. हे प्रकरण नंतर सीबीआयकडे सोपवले असता, त्‍यांनी बाबुशसह एकूण ३८ संशयितांवर आरोपपत्र दाखल केले होते.

सध्‍या ही सुनावणी दक्षिण गाेव्‍याचे खास न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर सुरू असून आज या प्रकरणात संशयित असलेले पणजीचे माजी महापौर टोनी रॉड्रीगीस यांच्‍या वकिलाकडून नाईक यांची उलट तपासणी घेण्‍यात आली. त्‍यावेळी नाईक यांनी ही माहिती दिली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ डिसेंबर रोजी ठेवण्‍यात आली आहे.

वीज बिल घोटाळा; दोघांची साक्ष

न्‍या. आगा यांच्‍या न्‍यायालयात पंचायत मंत्री माविन गुदिन्‍हो यांच्‍या विरोधात दाखल केलेल्‍या ५.४५ काेटींच्‍या वीज बिल सवलत घोटाळ्‍याची सुनावणीही झाली. आज या प्रकरणी सुरेंद्र मडकईकर आणि दत्ता बोरकर या दोन साक्षीदारांची साक्ष घेण्‍यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १५ डिसेंबर रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT