Police Station on Mopa Airport
Police Station on Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

मोपा विमानतळावर दोन दिवसांत पोलिस स्टेशन कार्यरत

दैनिक गोमन्तक

मोरजी : मोपा विमानतळ परिसरात उभारण्‍यात आलेले पोलिस स्‍थानक दोन दिवसांत कार्यरत करण्‍यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाच्या समस्या ऐकून त्यांना योग्य तो न्याय देण्‍यात येईल, अशी ग्वाही पेडणे तालुका पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिली.

पोलिस उपअधीक्षक कार्यालयात आज दि. 28 रोजी मोपा विमानतळ पोलिस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक महेश केरकर, चांदेल सरपंच तुळशीदास गावस, कासारवर्णे सरपंच करीश्मा नाईक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्‍यासह संयुक्त बैठक झाली. त्‍यावेळी शिरोडकर बोलत होते.

मोपा विमानतळ परिसरात स्वतंत्र पोलिस स्टेशन स्थापन करण्यात आले असून, निरीक्षकपदी महेश केरकर यांची नियुक्ती करण्‍यात आलेली आहे. या पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत वारखंड, नागझर, उगवे, मोपा, तांबोसे, तोरसे, पत्रादेवी, कासारवर्णे, हंसापूर, चांदेल, इब्रामपूर, हणखणे आणि हळर्ण या चौदा गावांचा समावेश करण्यात आला आहे.

परंतु या गावांपैकी बहुतांक गावातून मोपा विमानतळ परिसरात जाण्यासाठी किमान दोन किंवा तीन बसेस बदलाव्या लागणार आहेत. त्यामुळे हा खर्च परवडणारा नाही, अशी नागरिकांची भावना झाली आहे.

पेडणे पोलिस स्‍थानकावरील ताण कमी होणार

पेडणे तालुक्यासाठी एकमेव पेडणे पोलिस स्‍थानक होते. पत्रादेवी येथील पोलिस चौकी कधीच कार्यान्वित झाली नाही तर हरमल येथील चौकीकडे जाण्यासाठी साधी पायवाटही नाही. त्‍यामुळे लोक तक्रार करण्‍यासाठी केवळ पेडणे पोलिस स्टेशन गाठत असत.

त्यामुळे तेथे दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत होता. अशा स्थितीतच आता मोपा विमानतळ परिसरात स्वतंत्र पोलिस स्टेशन स्थापन करण्‍यात आल्‍यामुळे पेडणे पोलिस स्टेशनवरील ताण बराचसा कमी होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Lok Sabha Election 2024: ‘’शहजाद्याला PM बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा’’; व्होट जिहादवरुन मोदींनी काँग्रेसला पकडलं कोंडीत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

SCROLL FOR NEXT