Crime News  Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: सराफावर मास्क घालून हल्ला, संशयित गोव्‍याबाहेर पळाल्‍याचा संशय; पोलिसांची पथके मागावर

Goa Crime: २२ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान बड्डे येथील सोहन रायकर यांच्या मालकीच्या देवराय इंदिरा ज्वेलर्स या दुकानात हल्ल्याचीही घटना घडली होती.

Sameer Panditrao

मडगाव: बड्डे मडगाव येथील सराफावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोराच्या मागावर सध्या पोलिस असून संशयित गोव्याबाहेर पळून गेला असावा असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी तपासकामाबाबत अत्यंत गोपनीयता बाळगली आहे. संशयिताचा शोध चालू असल्याची माहिती फातोर्डा पोलिसांनी दिली.

क्राईम ब्रँचनेही या प्रकरणाचा तपास करीत आहे. संशयिताची सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली छबी पोलिसांनी गोव्यातील सर्व पोलिस ठाण्यात व बाहेरील राज्यातील पोलिस ठाण्यातही पाठवून दिली आहे. 

२२ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान बड्डे येथील सोहन रायकर यांच्या मालकीच्या देवराय इंदिरा ज्वेलर्स या दुकानात हल्ल्याचीही घटना घडली  होती.

एक इसम या दुकानात आला होता. त्याने आपला चेहरा मास्कने झाकला होता, त्याच्या हातात एक बॅगही होती. आपल्या आईचे दागिने असल्याचे सांगून, ते नव्याने करून घ्यायचे आहेत असे तो म्‍हणत होता. संशयिताचे एकूण वागणे संशयास्पद होते. काही कळण्याच्या अगोदर त्याने सोहनवर हातोड्याने वार केला होता. या हल्ल्यात तो किरकोळ दुखापतीवर बचावला होता. संशयिताकडे एक चाकू होता.

तो त्याने तेथेच टाकून नंतर पळ काढला होता. तो अस्खलित कोकणी बोलत असल्याने तो स्थानिक असल्याच्या ठाम निष्कर्षापर्यंत पोलिस पोचले आहेत. पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. देविदास पुढील तपास करीत आहे.

पोलिसांची दोन पथके

या घटनेला चार दिवस लोटून गेले आहे. तरीही मारेकरी पोलिसांना सापडलेला नाही. तपासासाठी फातोर्डा पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत. पोलिस संशयिताचे मोबाईल लोकेशनही पडताळून पाहत आहे. हा हल्ला का झाला हे अजूनही गुलदस्तात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT