Sexual Assault Dainik Gomantak
गोवा

Goa : अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गोव्यात दोन गुन्हे नोंद

डिचोली आणि सासष्टी येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार आणि छळ प्रकरणी संबंधित पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांमध्ये गोव्यात बलात्कार आणि अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. डिचोली आणि सासष्टी येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार आणि छळ प्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

डिचोली तालुक्यातील एका विद्यालयातील वरिष्ठ कारकूनने (युडीसी) 16 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार तिच्या पालकांनी दाखल केली होती. यानंतर तपासाची सूत्रं वेगाने हलवत डिचोली पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने विद्यालयात खळबळ माजली आहे तसेच पालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

डिचोलीत एका कराटे प्रशिक्षकाने काही अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आल्यावर चार वेगवेगळे गुन्हे पोलिस स्थानकात दाखल झाले आहेत.
मूळ कर्नाटकमधील आणि गेली अनेक वर्षे सासष्टी तालुक्यात राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विजय लमाणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आणि संशयित यांची मैत्री होती. त्याचा गैरफायदा उठवून संशयिताने तिचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Vakri Upay 2026: वक्री शनि वाढवणार 'या' 5 राशींच्या जातकांची डोकेदुखी, नशिबात मोठा संघर्ष; ताबडतोब करा हे उपाय

Iran Torlls UN: शोलेच्या ‘ठाकूर’सारखी युएनची अवस्था! इराणच्या नव्या मीम डिप्लोमेसीनं उडवली खळबळ; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

AI Human Control: 'एआय'वर हवा मानवी लगाम; तंत्रज्ञानाच्या वेगापेक्षा जागतिक नियंत्रणाची गरज

संपादकीय: फुटबॉलप्रेमींचा विश्वासघात

Lashkar-e-Taiba Commander Killed: दहशतवादाचा फणा ठेचला! लष्कर-ए-तैयबाचा कुख्यात कमांडर मूसा ठार, भारतीय जवानांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT