Mapusa Police News:  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Police: म्हापशात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पोलिस संरक्षण; गस्तही वाढवली

करासवाडा पुतळा विटंबना घटनेच्या पार्श्वभुमीवर पोलिस सतर्क

Akshay Nirmale

Mapusa Police News: करासवाडा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्दैवी तोडफोडीनंतर म्हापसा शहरातील महत्त्वाच्या शिवस्मारकांची, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

या पुतळ्यांची सुरक्षा आणि जतन सुनिश्चित करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांकडून पावले उचलण्यात आली आहेत. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन आणि म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तसेच आसगाव, कानका आणि करासवाडा या भागात 24 तास गस्त घालण्यात येत आहे. ऐतिहासक स्मारकांचे संरक्षण आणि अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी ही पावले उचलली आहेत.

करासवाडा-आकय येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केली होती. या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवप्रेमींनी दिला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिवप्रेमींनी करासवाडा-आकय येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पुन्हा स्थापना केली. यावेळी आमदार कार्लुस फेरेरा आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांनी शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक घातला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assembly Silver Jubilee: रौप्यमहोत्सवात राजकीय सामना रंगला! युरींच्या टीकेला मुख्यमंत्री सावंतांचे जोरदार प्रत्युत्तर; वाचला 'डबल इंजिन' सरकारच्या विकासाचा पाढा

UPI Payment Tracking: स्कूलच्या फीपासून हॉस्पिटलच्या बिलपर्यंत... युपीआय पेमेंट्स ठरणार देशाच्या आर्थिक विकासाचा आरसा; MoSPI कडून मोठा प्रस्ताव

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Horoscope 7 October 2026: गुंतवणुकीसाठी शुभ दिवस, बँक बॅलेन्समध्ये होणार तगडी वाढ! बुधवार ठरणार 'या' राशींसाठी गोल्डन डे

SCROLL FOR NEXT