Crime | Arrest Canva
गोवा

Bicholim Crime: 'ती' महिला अजूनही फरार! डिचोली फसवणूक प्रकरण; मास्टरमाईंड कॉन्स्टेबलची चौकशी सुरु

Goa Job Scam: रोहन वेंझी हा निलंबित पोलिस कॉन्स्टेबल सध्या फरार असलेल्या ‘प्रिया नाईक’ या महिलेला पैसे मिळवून देण्यासाठी मदत करीत होता, असा आरोप आहे. या प्रकरणात प्रिया हिच्या आमिषाला बळी पडलेल्या डिचोलीतील एका महिलेला म्हापसा पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Bicholim Job Scam Suspect Priya Naik And Suspended Constable

डिचोली: नोकरी देतो, असे सांगून लाखो रुपयांची अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस प्रिया नाईक नामक महिलेच्या शोधात असून, या प्रकरणातील मास्टरमाईंड आणि सध्या निलंबित असलेला पोलिस कॉन्स्टेबल रोहन वेंझी याची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

रोहन वेंझी हा निलंबित पोलिस कॉन्स्टेबल सध्या फरार असलेल्या ‘प्रिया नाईक’ या महिलेला पैसे मिळवून देण्यासाठी मदत करीत होता, असा आरोप आहे. या प्रकरणात प्रिया हिच्या आमिषाला बळी पडलेल्या डिचोलीतील एका महिलेला म्हापसा पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले आहे, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली. नोकरीच्या आशेने एका महिलेने रोहन वेंझी या पोलिस कॉन्स्टेबलच्या खात्यात पाच लाखांहून अधिक पैसे ट्रान्सफर केले आहेत.

दरम्यान, प्रिया नाईक हिचा अद्यापही थांगपत्ता लागला नसल्याने तक्रारदार पोलिस तपासाबाबत संशय व्यक्त करू लागले आहेत. दुसरीकडे संशयित महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकणार, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT