नारायण नाईक हल्लाप्रकरण Dainik Gomantak
गोवा

नारायण नाईक हल्ल्याप्रकरणी आरोपी इस्‍माईल शेख पोलिस रिमांडमध्ये

नारायण नाईक हल्लाप्रकरणी वास्कोमध्ये सापळा रचून क्राईम ब्रँचने कारवाई केली

दैनिक गोमन्तक

पणजी: सांकवाळ येथील आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक (Narayan Naik) यांच्यावरील हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार संशयित इस्‍माईल शेख ऊर्फ कब्बू याला गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने (Crime Branch) सापळा रचून अटक केली. त्याला आज पोलिस रिमांड घेण्यात येणार आहे. आतापर्यंत याप्रकरणी कब्बू याच्यासह तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश गावडे यांनी दिली. (Police have arrested Ismail Sheikh accused in Narayan Naik attack in Goa)

सांकवाळ पंचायतीतून काम संपवून आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक हे आपल्या गाडीकडे परतत असताना त्यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर संशयित फरारी झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी शोधकार्य गतिमान करून संशयित रामगोपाळ यादव याला अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर या प्रकरणात इस्‍माईल शेख व खलील फकीर याचा समावेश असल्याचे उघड झाल्यावर त्यांचा शोध सुरू झाला होता.

मात्र, ते फरारी झाल्याने त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. पोलिसांकडून शोधकार्य सुरू असल्याचे व त्यातून सुटका नाही असा अंदाज आल्यावर गेल्या 22 जुलैला संशयित खलील फकीर हा वास्को पोलिसांना शरण आला होता. हे प्रकरण क्राईम ब्रँच पोलिस तपास करत असल्याने त्याला त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

पोलिस संशयित इस्‍माईल शेख याच्या शोधात होते. त्याला पैशाची गरज असल्याने त्याने माजोर्डा येथील एका व्यक्तीशी संपर्क साधला होता. तो आज सकाळी पैसे नेण्यासाठी येणार असल्याने त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला होता. तो आला असता गजाआड करण्यात आले.

दरम्यान सांकवाळ येथील आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक (Narayan Naik) हल्ला प्रकरणातील संशयित फरार झालेला आरोपी खलील फकिराला (Khalil Fakirala) गुरुवारी पहाटे मुरगाव पोलिसांकडून (Murgaon Police) अटक करण्यात आली. नंतर त्याला गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

Goa Fishing Boat Missing: सोमवारी निघाले, पण परतलेच नाहीत! काणकोणच्या समुद्रात मासेमारी बोट गायब; 4 मच्छिमारांचा जीव टांगणीला

Goa Today News Live: लुथरा बंधूंना दिल्ली विमानतळावर गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT