Police Force Deployed outside Digambar Kamat House Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Protest : आंदोलनाची धास्ती; दिगंबर कामत यांच्या घरासमोर कडक पोलीस बंदोबस्त

दिगंबर कामत यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्ते निदर्शने करतील अशी माहिती मिळाल्याने हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र कामत यांच्या घरासमोर कुणीही फिरकले नाहीत.

सुशांत कुंकळयेकर

Goa Congress Protest : काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये गेल्याने नूवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. यानंतर आज गुरुवारी पोलिसांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या घरासमोर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. आज कामत यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्ते निदर्शने करतील अशी माहिती मिळाल्याने हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र कामत यांच्या घरासमोर कुणीही फिरकले नाहीत. नंतर काही वेळाने कामत हेही घराबाहेर पडले. सासष्टीचे मामलेदार लक्ष्मीकांत देसाई यांनीही या ठिकाणी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

काँग्रेस पक्ष सोडून भाजप पक्षात गेलेले नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या राय येथे गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आमदाराच्या घरासमोर अडविल्याने आंदोलकांनी आमदारांचा पुतळा त्यांच्या घरासमोरच काल बुधवारी जाळला. त्यापूर्वी त्या पुतळ्याच्या तोंडावर शेण मारून आपला निषेध व्यक्त केला. काल बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलकांना पोलिसांनी अडविल्यावर त्यांनी मामलेदार लक्ष्मीकांत देसाई यांच्याशी हुज्जत घातली.

दरम्यान काँग्रेसने डॅमेज कंट्रोलसाठीही प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसच्‍या पक्षश्रेष्‍ठींनी विधिमंडळ गटनेतेपदी युरी आलेमाव यांची निवड केली आहे. तथापि, हे पद स्‍वीकारण्‍यास ते इच्‍छुक नाहीत. तर दुसऱ्या बाजूने काँग्रेसमध्‍ये गोवा फॉरवर्डचे विलिनीकरण करण्‍यासही विजय सरदेसाई यांना फारसे स्‍वारस्‍य नाही. परिणामी आधीच मनोधैर्य खचलेल्‍या काँग्रेसची वाट अधिक खडतर बनली आहे.

दोन तृतीयांश आमदार फुटल्‍यानंतर गर्भगळीत झालेल्‍या काँग्रेसला बळकटी मिळावी, यासाठी पक्षांतर्गत प्रयत्‍न सुरू आहेत. काँग्रेसने तातडीने कुंकळ्ळीचे आमदार तथा पक्षाचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती केली. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्‍लीतील श्रेष्‍ठींच्‍या आदेशाद्वारे आलेमाव यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. ‘पक्षाने दिलेली जबाबदारी मी सांभाळेन, मी आनंदी आहे’, अशी प्रतिक्रिया युरी आलेमाव यांनी दिली आहे. मात्र, वास्‍तवात आलेमाव हे पदभार सांभाळण्‍यास उत्‍सुक नाहीत, असे सूत्रांचे म्‍हणणे आहे.

...म्‍हणून युरी आलेमाव नाखूष

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षश्रेष्‍ठींनी राहुल गांधी यांची भेट घडवून आणावी; त्‍यांच्‍यासोबत चर्चेअंती विधिमंडळ गटनेतेपदाचा ताबा घेणे योग्‍य ठरेल, अशी युरी आलेमाव यांची अपेक्षा होती. परंतु, प्रत्‍यक्षात ती फोल ठरली आहे. दुसरीकडे सध्‍या आपल्‍या नावाचा वापर करून घेण्‍यात येईल. मात्र, निवडणुकीच्‍या तोंडावर आपल्‍याकडे अधिकार राहतील का, अशी शंकाही त्‍यांना आहे. युरी हे गेले दोन महिने राहुल, सोनिया यांच्‍याशी संपर्काचा प्रयत्‍न करत होते; पण तो होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT