Fake Currency Dainik Gomantak
गोवा

बनावट नोटांच्या रॅकेटमधील सर्व आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

कारवार पोलिसांकडून मुख्य संशयित मुश्ताक बेग याचा शोध सुरुच

दैनिक गोमन्तक

पणजी : बनावट नोटा प्रकरणी चारही आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मडगाव, फातोर्डातील अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांसह चौघांनाही १४ दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे. कारवार पोलिसांकडून मुख्य संशयित मुश्ताक बेग याचा शोध अजूनही सुरुच आहे.

कारवार येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलसमोर अंकोला आणि कारवार पोलिसांनी गुरुवारी रात्री संयुक्त कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त करत 13 हजार रुपयांच्या खोट्या नोटा जप्त केल्या होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे अटक केलेल्या चारपैकी तिघे आरोपी मडगाव गोव्याचे रहिवासी असल्याचं समोर आलं होतं.

या प्रकरणी कोडीबाग कारवार येथील प्रवीण नायर (वय.46- हॉटेल कामगार), फातोर्डा- मडगाव येथील लार्सन सिल्वा (26), मडगाव येथील प्रनोय फर्नांडिस, लोयड्स लॉरेन्स स्टेविस यांना पोलिसांनी अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 26 बनावट नोटा तसेच 40 चलनी नोटांसह एक दुचाकी आणि चारचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार मुस्ताक हसन बेग हा फरार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: अन्नपदार्थांत अळ्या आणि कीडे, गोवा विद्यापीठ हॉस्टेल मेसचे कंत्राट अखेर रद्द; निकृष्ट खाद्यपदार्थप्रश्‍नी 'भाजयुमो'चा घेराव

Konkan Railway: रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, सातजण जेरबंद; 60 मोबाईल जप्त

WhatsApp Username Feature: चर्चा पूर्ण होईपर्यंत यूजरनेम नाहीच, 'व्हॉट्सॲप'चे केंद्र सरकारला उत्तर, सायबर सुरक्षेचा दिला हवाला

शॉक लागून वीज कर्मचाऱ्याचा मृत्‍यू; फांद्या छाटताना 'कटर'चा विद्युतभारीत वाहिनीला स्‍पर्श, अस्‍नोड्यातील दुर्घटना

ED Raid: गोव्यासह भारत, 'यूएसए'मधील 112.90 कोटींची मालमत्ता जप्त; 'लील इलेक्ट्रिकल्स' मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT