Goa Crime News |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण; डिचोलीतील 'त्या' कर्मचाऱ्याच्या कोठडीत वाढ

डिचोली तालुक्यातील एका विद्यालयातील वरिष्ठ कारकूनने (युडीसी) 16 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार तिच्या पालकांनी दाखल केली होती.

आदित्य जोशी

डिचोलीतील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. डिचोलीमधील एका नामांकित शाळेत यूडीसी म्हणून कार्यरत असलेल्या दयानंद घाटवळ (59) राहणार मये याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपी घाटवळला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Goa Crime News)

डिचोली तालुक्यातील एका विद्यालयातील वरिष्ठ कारकूनने (युडीसी) 16 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार तिच्या पालकांनी दाखल केली होती. यानंतर तपासाची सूत्रं वेगाने हलवत डिचोली पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने विद्यालयात खळबळ माजली आहे तसेच पालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

डिचोलीत एका कराटे प्रशिक्षकाने काही अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आल्यावर चार वेगवेगळे गुन्हे पोलिस स्थानकात दाखल झाले आहेत.
मूळ कर्नाटकमधील आणि गेली अनेक वर्षे सासष्टी तालुक्यात राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विजय लमाणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी आणि संशयित यांची मैत्री होती. त्याचा गैरफायदा उठवून संशयिताने तिचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: फुटबॉलप्रेमींचा विश्वासघात

Lashkar-e-Taiba Commander Killed: दहशतवादाचा फणा ठेचला! लष्कर-ए-तैयबाचा कुख्यात कमांडर मूसा ठार, भारतीय जवानांची मोठी कारवाई

खरी कुजबुज: एका नावाने उडवली अनेकांची झोप

Gyanesh Kumar Resignation Demand: 'SIR'वरून काँग्रेस आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, केंद्राच्या दबावाचा खरगेंचा आरोप

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये चीनचा धुव्वा उडवत टीम इंडियानं रचला इतिहास; अटीतटीच्या सामन्यात मारली बाजी

SCROLL FOR NEXT