Police custody of suspects in Panaji theft case Dainik Gomantak 
गोवा

पणजीतील सामान चोरीप्रकरणी संशयितांना पोलिस कोठडी

प्राथमिक चौकशीत संशयितांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राजधानी पणजीत पार्क केलेल्या वाहनाची काच फोडून आतील सामानाची चोरी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघांच्या टोळीला आज न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. प्राथमिक चौकशीत संशयितांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची आहे. हे तिघेही मूळ कर्नाटकातील असल्याने तेथील पोलिसांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

(Police custody of suspects in Panaji theft case)

पणजी पोलिसांनी संशयित श्रीशांत शेकू राठोड, सुनील हनमुंत माधव व सिकंदर ऊर्फ चिकू शेख अब्दुल बडेसाहब याना शिताफीने अटक केल्यानंतर त्यांनी चोरलेला माल जप्त केला होता. गुन्ह्यासाठी त्यांनी वापरलेली गाडीही जप्त केली आहे. राज्यात व कर्नाटकमध्ये तिघांचा इतर गुन्ह्यांमध्ये समावेश आहे का याची माहिती घेण्यात येत आहे. या टोळीमध्ये आणखी काहीजणांचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिघांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी तपासून पाहण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती करण्यात आली होती. जप्त केलेली गाडी संशयितांनी भाडेपट्टीवर घेतली होती. त्यामुळे या प्रकरणाशी गाडीचा चालकाचा काही संबंध आहे का याची पडताळणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT