Stray Puppies Poisoned Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! कुत्र्याच्या तीन पिल्लांना वीष देऊन ठार मारलं; कुंडईतील अंगावर शहारा आणणारी घटना

Stray Puppies Poisoned Goa: कुंडई - फोंड्यातील महालसा मधुराम सोसायटीच्या इमारत संकुलात अन्नाच्या शोधात येणाऱ्या कुत्र्याच्या तीन लहान पिल्लांना वीष घालून ठार मारण्याची घटना घडली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: कुंडई - फोंड्यातील महालसा मधुराम सोसायटीच्या इमारत संकुलात अन्नाच्या शोधात येणाऱ्या कुत्र्याच्या तीन लहान पिल्लांना वीष घालून ठार मारण्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून याप्रकरणी नलिनी नाईक यांनी तक्रार केली असून सुदिन कामत यांनी प्राणी क्रुरता प्रतिबंधक सोसायटीकडे या तक्रारीचा पाठपुरावा केला आहे.

अन्नाच्या शोधात ही कुत्र्याची चार पिल्ले कुंडई येथील एका सोसायटीत येत होती, त्यावेळेला काहीजणांकडून त्याना अन्न देण्यात येत होते, त्यावेळेला या कुत्र्यांना इमारत संकुलात का आणता, असा सवाल करून ठार मारण्याची धमकीही तिघाजणांनी दिली होती. त्याप्रमाणे या तिघांचीही नावे म्हार्दोळ पोलिस स्थानकात देण्यात आली आहे. पण जोपर्यंत मृत पिल्लांचा चिकित्सा अहवाल येत नाही, तोपर्यंत गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी (Police) सांगितले.

चारपैकी तीन पिल्ले लगेच मरण पावली तर एका पिल्लाला कुर्टीतील पशुचिकित्सा केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे या पिल्लावर उपचार करण्यात आले असून त्याचा जीव वाचला आहे. कुंडई येथील संबंधित सोसायटीतील काही लोकांनी या घटनेचा निषेध केला असून कारवाईचा मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT