Galgibaga Road Dainik GOmantak
गोवा

Galgibaga: गालजीबाग पुलाजवळ रस्ता खचला, लोखंडी कठडा कोसळला; दुरुस्तीची होतेय मागणी

Poinguinim Galgibaga Road: गालजीबाग पुलाजवळ लोलयेच्या बाजूने रस्ता खचला असून लोखंडी कठडाही कोसळला आहे. मडगाव-कारवार जुन्या हमरस्त्यावरील सुमारे तीन मीटर लांब रस्ता खचून माती वाहून गेली आहे.

Sameer Panditrao

काणकोण: पैंगीण येथील गालजीबाग पुलाजवळ लोलयेच्या बाजूने रस्ता खचला असून लोखंडी कठडाही कोसळला आहे. मडगाव-कारवार जुन्या हमरस्त्यावरील सुमारे तीन मीटर लांब रस्ता खचून माती वाहून गेली आहे. मात्र, या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांचे दुर्लक्ष होत आहे.

ऑगस्टमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता खचला होता. २००९ मध्ये आलेल्या पुरामुळे गालजीबाग पुलापासून सुमारे ५० मीटर रस्ता कमकुवत बनला आहे. त्यासाठी त्याचे मजबुतीकरण करणे काळाची गरज आहे. मडगाव-कारवार प्रवासी बस गाड्यांची वाहतूक याच रस्त्याने होते. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.

जेट पॅचरद्वारे डागडुजी

राज्यातील सर्वच भागांमधील रस्ते पावसाळ्यात खड्डेमय बनले आहेत. शिरोडा मतदारसंघातील शिरोडा, पंचवाडी, बेतोडा-निरंकाल-कोनशे कोडार आणि बोरी गावातील रस्तेही याला अपवाद नाहीत. जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्वखर्चाने जेट पॅक्‍चरद्वारे या रस्त्यांची दुरुस्ती सुरुवात केली.

अंतर्गत रस्त्‍यांच्या दुरुस्तीला प्रारंभ केल्याने वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. वाजे-शिरोडा तसेच पंचवाडी आदी भागातील रस्ते जेट पॅचरने दुरुस्त केले जात आहेत. मंत्री शिरोडकर म्हणाले, की यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने रस्ते खड्डेमय बनले; परंतु बऱ्याच भागांमधील रस्ते अद्याप चांगल्या स्थितीत आहेत.

खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतुकीत व्यत्यय येतो. नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी रस्त्याचे दुरुस्तीकाम हाती घेतले आहे. गेले चार महिने पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT