PM Kisan Maandhan Yojana  Gomantak Digital Team
गोवा

PM Kisan Samman Nidhi : ‘त्या’ अपात्रांवर कारवाईचा बडगा

पीएम किसान योजना : पैसे परत करण्यासाठी प्रशासनाने बजावल्या नोटिसा

गोमन्तक डिजिटल टीम

PM Kisan Samman Nidhi : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात. मात्र, काही अपात्र लोक जाणीवपूर्वक किंवा अनावधानाने या योजनेचा लाभ घेताहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या योजनेतील अपात्र लोकांची माहिती मानकांनुसार पोर्टलवर जारी केली आहेत. तसेच आतापर्यंत ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांना पैसे परत करण्यासंदर्भात नोटीसा बजावली आहेत.

बार्देशात पीएम किसाम सन्मान निधीअंतर्गत अपात्रतेचे 150 जण आहे, अशी माहिती कृषी कार्यालयातून प्राप्त झाली आहे. काहीजण आयकर भरतात किंवा ज्यांच्या नावावर 1/14 चा उतारा (शेतजमीन) नाही, असे याचे लाभार्थी होते. मात्र, आता ऑडिट केल्यानंतर या अपात्र लाभार्थ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यांनी हे योजनेचे पैसे एकरकमी पद्धतीने परत करावेत, अशा नोटीसा संबंधितांना बजावल्या गेल्या आहेत.

चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे काम सध्या कृषी संचालनालयाकडून केले जात आहे. घरातील एकाच शेतजमिनीवर कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे हप्ता घेत होते, त्यांना हप्त्याचे 2 हजार रुपये पैसे परत करावे लागतील.

यांना वगळले योजनेतून

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पैसे घेणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना कृषी संचालनालय कार्यालयात रोखीने पैसे जमा करावे लागतील.

आर्थिकदृष्ट्या संपन्न व्यक्ती, सरकारी कर्मचारी, एकाच शेतजमिनीवर कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य योजनेचे लाभार्थी, प्राप्तीकरदाता यांना योजनेतून वगळले गेले आहे.

पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत मला पैसे मिळायचे. मात्र, आता योजनेच्या हप्त्याचे पैसे परत करावे अशी नोटीस बजावली आहे. कारण, शेतजमिनीवर माझ्या वडिलांचे नाव आहे, तथा मी प्राप्तीकरदाता आहे. योजनेचे लाभार्थी बनविताना आधी कृषी विभागाने याची शहानिशा करायला हवी होती. आता विनाकारण हा मानसिक त्रास आहे. आता नोटीसा पाठवून पैसे परत करा, असे सांगताहेत. एकदम 18 हजार पैसे परत करणे माझ्यासारख्या सामान्यांना परवडणारे नाही.

-शेतकरी, हळदोणा

कृषी कार्ड पाहून कृषी विभागाने सरसकट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले. मुळात पैसे देण्यापूर्वी सरकारने कोण आयकर करदाता आहे किंवा कुणाच्या नावावर शेतजमीन आहे, हे तपासणे गरजेचे होते. आणि आता अमुक रक्कम परत करा म्हणणे चुकीचे आहे.

विठ्ठल नाईक, नास्नोळा शेतकरी क्लबचे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT