लोलये पंचायत Dainik Gomantak
गोवा

लोलये पंचायत क्षेत्रात अंतर्गत रस्त्यांवरील पुलांची दुर्दशा

स्लॅबच्या सळ्या गंजल्या: तातडीने दुरुस्तीची मागणी

दैनिक गोमन्तक

काणकोण: लोलये पंचायत क्षेत्रातील विविध अंतर्गत रस्त्यांवरील पुलांची दुरवस्था झाली आहे. यात पणसखंडे येथील श्री व्यंकटेश देवालया जवळचा पूल त्याचप्रमाणे पेडे- लोलये येथे कोकण रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रस्त्यावरील पुलाचा समावेश आहे.

लोलये पंचायतक्षेत्रातील या दोन्ही जीर्ण झालेल्या पुलांच्या स्लॅबच्या लोखंडी सळ्या गंजून त्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी हे दोन्ही पूल कोसळू शकतात, असा पंचायत क्षेत्रातील स्थानिक रहिवाशांचा दावा आहे.पणसखंडे येथील पूल उभारून अनेक वर्षे झाली आहेत. या जीर्ण पुलाच्या उघड्या पडलेल्या लोखंडी सळ्यांवर सिमेंटचा गिलावा देऊन स्लॅब मजबूत करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.

पेडे- लोलये येथील रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या रस्त्यावरील साकवाची हीच परिस्थिती झाली आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहाय्यक अभियंत्यांनी या कमकुवत झालेल्या पुलाची पाहणी केली होती, मात्र, त्या पुलाला मजबुती देण्याचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. या पुलाचा संरक्षक कठडा ही कोसळलेला आहे, त्यामुळे वाहने रस्त्याखालच्या सखल भागात कोसळण्याचा धोका आहे.

काणकोण तालुक्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे आधीच दुर्दशा झाली आहे.यासंदर्भात काणकोण काँग्रेसचे नेते जनार्दन भंडारी यांनी आंदोलन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT