Water Bill Problem Dainik Gomantak
गोवा

भरमसाठ पाणी बिले; घोगळवासीय संतप्त

खात्यावर धडक: सुधारीत बिले देण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव: पाणी पुरवठा खात्याकडून दिल्या गेलेल्या भरमसाठ बिलांवरून संतप्त झालेल्या घोगळ गृहनिर्माण मंडळ वसाहतीतील रहिवाशी संतापले. खात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन घोगळवासीयांनी अधिका-यांना जाब विचारला. भरमसाठ आणि अवास्तव असलेली बिले दुरुस्त करून सुधारीत पाणी बिले देण्याची मागणी केली.

कार्यालयावर धडक दिलेल्यांमध्ये महिलांची संख्या अधिक होती. त्यांनी सरकार लोकांची लूट करत असल्याचा आरोपही केला. काही घरांना हजारे रुपयांची तर अन्य काहींना लाखभराचे बिल आल्याचा अरोप करून बिलांची आकारणी वाटेल, मनमानी पध्दतीने केल्याचे त्यापैकी अनेकांनी सांगितले.

सदर वसाहतीत बहुतेक घरांना आता मलनिस्सारणाच्या जोडण्या दिल्या गेल्या असून या बिलांत त्याचा अंतर्भाव केला गेलेला असल्याचे अधिकारी सांगत असले तरी काही घरांना ही जोडणी नसतानाही तशीच बिले आल्याचे महिलांचे म्हणणे आहे. सरकारने ही बिले दुरूस्त करावीत, अशी त्यांची एकमुखी मागणी असल्याचे यावेळी दिसून आले.अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहिती नुसार अनेकांची बिले अनेक वर्षापासून प्रलंबित होती व त्यामुळे बिलांची रक्कम वाढलेली आहे. तर काही घरांत एकाच मीटरवर अनेक भाडेकरू राहतात व त्यामुळे वापरलेल्या पाण्याच्या हिशेबाप्रमाणे बिले आलेली आहेत.

सरकारने 16 हजार युनिट पाणी मोफत असेल, असे जाहीर केले होते. मग आता बिले भरमसाठ प्रमाणात कशी आली, त्याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे. संबंधित अधिकाऱ्यांनी महिलांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात देण्यास सांगितले. मात्र, बिलांची रक्कम कमी करणार, याबाबत कोणतेच आश्र्वासन दिले नाही.

-तारा केरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT