Netravali Wildlife Sanctuary 
गोवा

Netravali: नेत्रावळीत शिकार पार्टीचे नियोजन भोवले; कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना काडतूससह रंगेहाथ पकडले

Netravali Wildlife Sanctuary: वन खात्याचे कर्मचारी गस्तीवर गेले असता त्यांनी या सोळा लोकांना शिकारीला गेले असता पकडले.

Pramod Yadav

Netravali Wildlife Sanctuary

नेत्रावळी अभयारण्यातील साळजीणी येथे शिकार करून पार्टी करण्यासाठी गेलेल्या सोळा जणांना वन खात्याने पाच काडतूससह रंगेहाथ पकडले. पकडलेले आरोपी हे कदंब महामंडळाचे कर्मचारी असून ते रानटी जनावरांची शिकार करून पार्टी करण्यासाठी गेले होते.

कदंब महामंडळाचे सांगे भागातील कर्मचारी विशेषतः वाहन चालक, वाहक पार्टी करण्यासाठी नेत्रावळी अभयारण्यातील साळजीणी येथे शनिवारी रात्री 9.30 च्या दरम्यान टप्याटप्यांने जात होते.

त्यामुळे वन कर्मचाऱ्यांना संशय आला. वन खात्याचे कर्मचारी गस्तीवर गेले असता त्यांनी या सोळा लोकांना शिकारीला गेले असता पकडले.

अजून दोघेजण पळून गेल्याची शक्यता वन खाते पडताळून पाहत आहे. वन खात्याकडून वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनपाल दामोदर सालेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रावली अभयारण्याचे आरएफओ देविदास वेळीप पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT