Vajri man accidental death Dainik Gomantak
गोवा

Pirna Nadoda: वाढदिवसादिवशी बाहेर पडला, नंतर सापडला कुजलेला मृतदेह; 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Vajri man accidental death: पिर्ण-नादोडा रस्त्याच्या बाजूला एक कुजलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह आशिष कुमार झा (वय २५, रा. वझरी, मूळ उत्तर प्रदेश) यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.

Sameer Panditrao

पिर्ण-नादोडा रस्त्याच्या बाजूला एक कुजलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह आशिष कुमार झा (वय २५, रा. वझरी, मूळ उत्तर प्रदेश) यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहिती नुसार, त्याचा मृत्यू स्वयंअपघातामुळे झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आशिष ७ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाला होता.

आशिष ७ ऑगस्ट रोजी आपल्या वाढदिवशी वझरी येथून पिर्णा मार्गे म्हापसाच्या दिशेने निघाला होता. त्याआधी तो मित्रांसोबत खोलीवर असल्याची माहिती मिळालेली आहे. पण यानंतर तो घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशीही त्याचा संपर्क साधता आला नाही. अखेर ९ ऑगस्ट रोजी मोपा पोलिसांत त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

पिर्णा-नादोडा मार्गावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांना रस्त्यावरती दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. कोलवाळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता दाट झाडीझुडुपामध्ये आशिषचा मृतदेह आणि त्याची दुचाकी सापडली. मृतदेहाच्या जवळ सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्याची ओळख पटवण्यात आली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कोलवाळ पोलिस तपासात पुढील माहिती गोळा करत आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT