Pink e Auto Rickshaw
Pink e Auto Rickshaw Dainik Gomantak
गोवा

महिला सक्षमीकरणासाठी ‘पिंक ई-रिक्षा’

दैनिक गोमन्तक

म्हापसा: रोटरी क्लब ऑफ म्हापसाने पुढाकार घेत म्हापसा शहरात पहिली ‘पिंक ई-रिक्षा’ सेवा सुरू केली आहे. आमदार जोशुआ डिसोझा यांच्या उपस्थितीत या रिक्षाला हिरवा बावटा दाखविण्यात आला. या उपक्रमाला ईडीसीमार्फत महिलांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.

(Pink e Auto Rickshaw introduced in Goa for women empowerment)

या रिक्षेची एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर सुमारे 120 किलो मीटरचा अंतर ती कापू शकेल. बॅटरी चार्ज होण्यास तीन तास वेळ लागतो. या रिक्षा केवळ महिला प्रवाशांसाठीच असेल. जोडपे किंवा कुटुंब असल्यास पुरुषाला रिक्षात बसण्यास मुभा असेल, पण मुख्यतः महिलांचा प्रवास सुरक्षित असावा हा त्यामागचा प्रमुख हेतू आहे. ही सेवा विशेषतः महिलांसाठी समर्पित असल्याचे जोशुआ म्हणाले. (Pink e Auto Rickshaw)

प्रीती केरकर ठरल्या पहिल्या सारथी

सध्या शहरात अशाप्रकारे एकूण पाच पिंक रिक्षा सेवेत असतील. उर्वरित चार रिक्षा या 15 जुलैपर्यंत सेवेत दाखल होतील. स्थानिक महिला प्रीती केरकर या पहिल्या पिंक रिक्षाच्या सारथी आहेत. तर संपूर्ण गोव्यात एकूण 20 रिक्षा असतील. भविष्यात महिलांचा जसा पाठिंबा लाभेल, तशी ही संख्या वाढत जाईल. लवकरच या रिक्षांबाबत विशेष मोबाईल क्रमांक किंवा अ‍ॅप सुरू करण्यात येणार आहे. तात्पुरता या रिक्षा शहरात टॅक्सी स्टॅण्ड किंवा पायलटच्या ठिकाणी उपलब्ध असतील. सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत त्या रस्त्यावर धावतील.

म्हापशात देशातील पहिली सेवा : जोशुआ

पिंक ई-रिक्षा ही सेवा देशात पहिल्यांदाच म्हापशात सुरू झाली असून त्याची सुरवात गोव्यात आणि विशेषतः माझ्या मतदारसंघातून होत असल्याने मी खूप आनंदीत आहे. पिंक रिक्षाचे शुल्क हे सामान्यरित्या मीटरप्रमाणेच असेल. ही इलेक्ट्रॉनिक रिक्षा असून या माध्यमातून स्थानिक पातळीवर महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाल्याचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT