Saint Xavier Exposition Pilgrim Village Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: ‘पिलग्रीम व्हिलेज’ला उत्स्फूर्त प्रतिसाद! भाविकांची होतेय इकोफ्रेंडली सोय

Saint Xavier Exposition Pilgrim Village: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या १८व्या शवप्रदर्शनासाठी सरकार आणि चर्च संघटनेकडून भाविकांसाठी ‘पिलग्रीम व्हिलेज’ (भाविक गाव) नावाखाली राहण्याची सोय केली गेली आहे. येथे तात्पुरती १७ कॉटेजीस उभारली गेली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Saint Xavier Exposition Pilgrim Village

तिसवाडी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या १८व्या शवप्रदर्शनासाठी सरकार आणि चर्च संघटनेकडून तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी ‘पिलग्रीम व्हिलेज’ (भाविक गाव) नावाखाली राहण्याची सोय केली गेली आहे. येथे तात्पुरती १७ कॉटेजीस उभारली गेली आहेत. एका कॉटेजमध्ये सुमारे १२ बेड आहेत. पिलग्रीम व्हिलेजला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती निंफा डिसिल्वा यांनी दिली.

शवप्रदर्शन सोहळा सुरू झाल्यापासून ७५ जणांनी येथे वास्तव्य केले आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या एका कॉटेजमध्ये आम्ही १२ जणांची सोय केली आहे. काही कॉटेजीस केवळ पुरुष आणि महिलांसाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत, तर काही एकाच कुटुंबाच्या सदस्यांसाठी.

येथे भाविकांना जेवणाची सोयदेखील करण्यात आली आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यासाठी ३०० रुपये शुल्क घेतले जाईल, अशी माहिती डिसिल्वा यांनी दिली.

‘पिलग्रीम व्हिलेज’ हे बासेलिका चर्चच्या समोर असल्याने भाविकांना येथे चालत प्रार्थनेला जाता येईल, सध्या तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यातील भाविक येथे आले आहेत. आम्ही बुकिंग फोनद्वारे घेतो; परंतु शुल्क येथे पोहोचल्यावरच घेतले जाईल, असे डिल्सिल्वा यांनी स्पष्ट केले.

फादर हेन्री फाल्काव, शवप्रदर्शन प्रमुख

‘पिलग्रीम व्हिलेज’ हा भाविकांची उत्तम सोय व्हावी या उद्देशाने केला होता. तात्पुरती कॉटेज उभारून तेथे राहण्याची सोय केली गेली असून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी हे फायदेशीर ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT