Vedanta Mining Dispute Dainik Gomantak
गोवा

Bicholim Mining: 'मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कायदेशीर लढा'; पिळगावमधील शेतकऱ्यांचा निर्धार

Pilgao Framers Protest: मागण्या पुढे करून रस्त्यावर उतरलेल्या पिळगावमधील शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. येत्या सोमवारपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर कायदेशीर लढा देणार, असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Pilgao Farmers Protest Vedanta Mining Dispute

डिचोली: मागण्या पुढे करून रस्त्यावर उतरलेल्या पिळगावमधील शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. येत्या सोमवारपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर कायदेशीर लढा देणार, असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे. आज (शुक्रवारी) शेतकऱ्यांनी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांना पुन्हा एकदा मागण्यांचे निवेदन दिले आहे.

दरम्यान, पिळगावमधील शेतकऱ्यांचे आंदोलन मिटण्याची चिन्हे दिसत असून, पुढील आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सरकार तसेच ‘वेदान्ता’च्या व्यवस्थापनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. शेतीसंदर्भातची मागणी ‘वेदान्ता’ कंपनीकडून विचारात घेण्यात आली असून, केवळ ’रिट्रेंच’ कामगारांसंबंधीच्या मागणीवर अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती मिळाली आहे.

सुधाकर वायंगणकर आणि अनिल सालेलकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या एका गटाने आज सकाळी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी कासकर यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या या गटाने उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर पुन्हा एकदा आपली कैफियत मांडून मागण्यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढा, अशी विनंती केली. निवेदनाची एक प्रत शेतकऱ्यांनी आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या कार्यालयात दिल्याची माहिती मिळाली आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रूपाने शेतजमिनीच्या प्रतिचौरस मीटरमागे ५ हजार ४०० रुपये देऊन ही रक्कम पाच वर्षांत अदा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याचे बाकी असल्याचे समजते. दुसऱ्या बाजूने कपात केलेल्या कामगारांच्या मागणीवरही तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांसह कामगारांच्या प्रस्तावाला सहमती दिली आणि तसा करार झाला, तर शेतकऱ्यांचे आंदोलन मिटण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT