Cattle Pound in Pilerne Dainik Gomantak
गोवा

Cattle Pound in Pilerne: पिळर्ण पंचायतीची 'भूतदया'; जखमी गुरांसाठी राबवला अनोखा उपक्रम

पिळर्ण पंचायतीने एक कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे.

दैनिक गोमन्तक

Cattle Pound in Pilerne: वाळपईमध्ये पोटात 30 किलो प्लॅस्टिक असल्यामुळे एका गाईचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यानंतर गाई-गुरांना मानवी आधाराची किती गरज आहे ही गोष्ट अधोरेखित झाली. यातच पिळर्ण पंचायतीने एक कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे. पंचायतीतर्फे गावातील आजारी आणि जखमी गुरांवर उपचार करण्यासाठी कॅटल पाउंडची उभारणी करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना पिळर्णचे उपसरपंच अमरनाथ गोवेकर म्हणाले की, अनेक आजारी आणि जखमी गुरे रस्त्यावर दिसतात. त्यामुळेच पंचायतीने या आजारी आणि जखमी गुरांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या हितचिंतकांकडून जमा झालेल्या सुमारे 10 लाख रुपये खर्चून आम्ही कॅटल पाउंड बांधले आहे.

आम्ही पंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांवर दिसलेली आजारी आणि जखमी गुरे इथे आणतो आणि त्यांच्यावर या गोठ्यात उपचार करतो. या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी दोन पशुवैद्यकीय डॉक्टर पंचायतीला मदत करतात.

एकदा हे प्राणी पूर्णपणे बरे झाले की त्यांना सोडले जाते. पंचायतीने नेमलेले केअरटेकर त्यांची काळजी घेतात. भविष्यात, भटकी गुरेही या कॅटल पाऊंडमध्ये ठेवण्याची पंचायतीची योजना असल्याचे गोवेकर यांनी सांगितले. पंचायतीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT