Pilerne Fire | Fire in Goa Paint Factory Dainik Gomantak
गोवा

Pilerne Fire : बर्जर कंपनीत आग धुमसतीच; तिसर्‍या दिवशीही ढिगारा हटवून पाणी-फोम मिश्रित फवार्‍यांचा मारा

मंगळवारी 10 जानेवारी रोजी दुपारी या पेंट कंपनीच्या गोदामास शॉर्ट सर्किटमुळे भीषण लाग लागली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील बर्जर बेकर कोटिंग या पेंट कंपनीस लाग लागल्यानंतर तिसर्‍या दिवशीही अग्निशमन दलाचे इथे काम सुरुच होते. गोदामाच्या जाग्यावरील ढिगारा हटवून तिथे जवानांकडून पाण्याचा मारा केला जात होता. जेणेकरुन ही आग पूर्णपणे विझावी. आज गुरुवारी संध्याकाळपर्यंत हा आग धुमसण्याचा प्रकार बंद होणार असा अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे.

मंगळवारी 10 जानेवारी रोजी दुपारी या पेंट कंपनीच्या गोदामास शॉर्ट सर्किटमुळे भीषण लाग लागली होती. या आगीच्या नुकसानीची नेमकी अधिकृत हानी समोर आली नसली तरी नुकसानीचा आकडा हा 50 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बुधवारी संध्याकाळपासून गोवा अग्निशमन दलाकडून हायड्रॉलिक क्रेनच्या तसेच जेसीबीच्या सहाय्याने हा ढिगारा बाजूला करुन त्याखाली धुमसणारी आग रोखण्याचे काम चालूच होते.

गुरुवारी देखील दलाचे जवान घटनास्थळी ढिगार्‍यावर पाणी-फोमचा मिश्रित फवारा मारत होते. बुधवारी सकाळी 6.30 वा. ही आग अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर पूर्णपणे आटोक्यात आणली होती. मात्र काही ठिकाणी धुमसण्याचा प्रकार सुरुच होता. जो तिसर्‍या दिवशी बर्‍यापैकी नियंत्रणात आला होता. या आगीमुळे गोदामानजीक वाहनतळावर पार्क केलेल्या कंपनीतील कर्मचार्‍यांची जवळपास 60 दुचाक्या भस्मसात झाल्या. तर दोन चारचाकी जळाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT