Pilerne Fire | Fire in Goa Paint Factory Dainik Gomantak
गोवा

Pilerne Fire: आगीवर नियंत्रण; मात्र, जनजीवन विस्कळीतच

आगीची तीव्रता आणि भडका पूर्णपणे आटोक्यात येण्यास तब्बल 16 तास लागल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.

दैनिक गोमन्तक

Fire in Goa Paint Factory: पिळर्ण येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बर्जर बेकर कोटींग या रंग तयार करणाऱ्या कंपनीच्या गोदामाला मंगळवारी दुपारी लागलेली भीषण आग आता नियंत्रणात आली असली तरी या परिसरातील जनजीवन अद्याप विस्कळीतच आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी येथे लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची मुदत 72 तासांनी वाढवली आहे.

आगीची तीव्रता आणि भडका पूर्णपणे आटोक्यात येण्यास तब्बल 16 तास लागल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. पाणी-फोम मिश्रित फवाऱ्याचा सातत्याने मारा करूनही दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी आग धुमसणे सुरूच होती.

उपलब्ध माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा दावा केला जात आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. मंगळवारी रात्री उशिरा सरकारने कंपनीलगतच्या दोन किलोमीटर परिसरातील लोकांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शक सूची जारी केली होती.

तिची मुदत जिल्हाधिकाऱ्यांनी आता 72 तासांनी वाढवली आहे. यासंदर्भात उत्तर गोवा अग्निशमन दलाचे साहाय्यक विभागीय अधिकारी अजित कामत म्हणाले की, आम्ही आगीवर नियंत्रण मिळविले असून आतापर्यंत 4 टन फोम तसेच 12 लाख लिटर पाणी आग विझविण्यासाठी वापरले आहे.

तर दलाचे 100 कर्मचारी घटनास्थळी दिवस-रात्र काम करत आहेत. शिवाय संरक्षण, नौदल, एमपीटीचे आम्हाला साहाय्य मिळत आहे.

आगीवर नियंत्रण आल्यानंतर बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत चार जेसीबींच्या साहाय्याने येथील राडारोडा (डेब्रिस) हटविण्याचे काम सुरू होते. गोदामाचा स्लॅबही मोडून पडल्याने तो हटविण्याची गरज आहे.

हा स्लॅब बेसमेंटवर पडला असून तिथेच प्रामुख्याने आग जास्त धुमसत आहे. हा स्लॅब हटवण्यासाठी शक्तिशाली हायड्रॉलिक क्रेन घटनास्थळी मागविण्यात आली आहे. ती रात्री उशिरापर्यंत पोहोचेल, असे सांगण्यात आले.

बुधवारी सकाळी 6.30 वाजता आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दल आणि प्रशासकीय यंत्रणांच्या परिश्रमाचे ही चीज आहे. वसाहतीमधील इतर कारखान्यांचा वीजपुरवठा मंगळवारी रात्री 11 वाजताच पूर्ववत केला आहे. - आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, अध्यक्ष जीआयडीसी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

SCROLL FOR NEXT