Pilerne Fire
Pilerne Fire Dainik Gomantak
गोवा

Pilerne Fire: पिळर्ण येथे डेब्रिस हटविताना आग धुमसली

दैनिक गोमन्तक

Pilerne Fire: पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील ‘बर्जर बेकर कोटिंग’ या पेंट कंपनीमधील डेब्रिस काढताना किंचित आग धुमसण्याचा प्रकार घडला. यावेळी पिळर्ण अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत यावर नियंत्रण मिळविले. मंगळवार, 17 रोजी सकाळी हा प्रकार घडला.

या पेंट कंपनीला मंगळवार, 10 रोजी भीषण आग लागून कंपनीचा संपूर्ण गोदाम जळून खाक झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात इथे जळालेल्या साहित्याचा ढिगारा निर्माण झाला असून सध्या तो हटविण्याचे काम केले जात आहे.

यावेळी डेब्रिस काढण्याचे काम सुरू असताना तिथे ढिगाऱ्याखाली अचानक आग धुमसण्याचा प्रकार घडला.

या आगीचा धूर आकाशात गेल्याचे निदर्शनास येताच भीती व्यक्त करत पंचसदस्य दिनेश मोरजकर यांच्यासमवेत साळपे, कांदोळीतील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

मात्र, या प्रकारानंतर पिळर्ण अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. आगीमुळे निर्माण झालेला प्रदूषणकारी धूर कंपनीच्या आवारात पसरला होता.

अग्निशमन’ची एक गाडी घटनास्थळी

या डेब्रिजखाली अजूनही आग धुमसत आहे. डेब्रिज हटविण्याचे काम करताना त्याखालील रसायनद्रव्य पदार्थास ऑक्सिजनचा संपर्क झाल्यामुळे ही आग धुमसली. मात्र, ती दलाने वेळीच विझविली. हा डेब्रिज पूर्णतः काढेपर्यंत असे धुमसणारे प्रकार घडतच राहतील.

त्यामुळे लोकांनी घाबरण्याची काही गरज नाही, असे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. खबरदारी म्हणून अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी ठेवण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT