Goa University News Dainik Gomantak
गोवा

Goa University: पेपर चोरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न! कुलगुरू, कुलसचिवांची परस्परविरोधी वक्तव्ये; अहवालाचा नाही थांगपत्ता

Goa University Professor Paper Leak Scam: प्राध्यापकाने प्रश्नपत्रिकांची चोरी केल्याचे प्रकरण दडपण्याच्या नादात कुलगुरू आणि कुलसचिवांनी परस्परविरोधी माहिती दिली आहे.

Sameer Panditrao

Goa University Paper Leak

पणजी: भौतिकशास्त्र विभागाच्या प्राध्यापकाने प्रश्नपत्रिकांची चोरी केल्याचे प्रकरण दडपण्याच्या नादात कुलगुरू आणि कुलसचिवांनी परस्परविरोधी माहिती दिली आहे. कुलगुरूंच्या मते, सत्यशोधन समितीचा अहवाल त्यांनी कुलपतींना दिला आहे, तर कुलसचिवांच्या म्हणण्यानुसार तो अहवाल कार्यकारी समितीच्या विचारार्थ सादर केला जाणार आहे.

कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांनी हा अहवाल प्राप्त झाल्याचे मान्य केले आणि तो आपण कुलपती तथा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना सादर केला आहे. त्यांच्याकडून पुढील आदेशाची आपणाला प्रतीक्षा असल्याचे म्हटले आहे.

कुलसचिव प्रा. सुंदर धुरी यांच्या म्हणण्यानुसार, या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. तो विद्यापीठाच्या कार्यकारी समितीसमोर विचारार्थ ठेवला जाणार आहे. यामुळे नेमका अहवाल आहे कोणाकडे, असा प्रश्न पडला आहे. कुलपती आदेश देणार, की कार्यकारी समिती निर्णय घेणार, याविषयीही या दोघांनी संभ्रम निर्माण केला आहे.

गोवा विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्रश्नपत्रिका चोरीप्रकरणी चौकशीच्या अहवालाची पोलिसांनाही प्रतीक्षा आहे. त्या अहवालाच्या आधारे गुन्हा नोंदवता येईल का, याची चाचपणी पोलिसांनी चालवल्‍याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विद्यापीठाने दोन विभागप्रमुखांचा समावेश असलेली सत्यशोधन समिती नेमली होती.

त्या समितीला केवळ ४८ तासांचा अवधी देण्यात आला होता. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनीही तातडीने अहवाल सादर करा, असा आदेश विद्यापीठाला कुलपती या नात्याने दिला होता. त्यानुसार राज्यपालांना अहवाल सादर करण्यात आला आहे. समितीने आज आपला अहवाल कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांना सादर केला.

अहवालात काय?

‘गोमन्तक’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. एका विद्यार्थिनीला मदत करण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप त्या तक्रारीत केला आहे. संबंधित प्राध्यापकाला नंतर विद्यापीठाने निलंबितही केले आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न विविध पातळीवर होत असल्याने या अहवालात दडलेय काय, याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 5,100 पाठवत मुलगी म्हणाली, 'व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार दाखवा'; लेकरांची वाट बघत बाप गेला निघून, अखेर वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी दिला अग्नी

Hardik Pandya KKR Trade: IPL 2027 आधी मोठा ट्विस्ट! कोलकाताचा नवा 'कॅप्टन' हार्दिक पांड्या? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

US Student Visa: अमेरिकेचा भारतीय विद्यार्थ्यांना 'दे धक्का'! स्टुडंट व्हिसा मंजुरीत 62 टक्क्यांची घसरण; रिपोर्टमधून खुलासा

Salman Khan Assam Flood Relief: 'भाईजान' पुन्हा ठरला देवदूत! आसाममधील पूरग्रस्तांसाठी सलमान खान उभारणार 500 घरं; चाहते म्हणाले, 'Real Life Hero'

Budh Guru Yuti 2026: 15 ऑगस्टला घडणार महासंयोग! 'या' 5 भाग्यवान राशींना मिळणार मोठी गुड न्यूज; होणार तगडा धनलाभ

SCROLL FOR NEXT