Pet Friendly Cafes Dainik Gomantak
गोवा

Pet Friendly Places Goa: "नो पेट्स अलाऊड"मुळे अडकलाय? पहा गोव्यातली खास 'पेट-फ्रेंडली' ठिकाणे

Goa Pet Resorts: पाळीव प्राण्यांसोबत गोव्याच्या सहलीचा आनंद घेण्यासाठी आम्ही काही खास ठिकाणांची यादी तयार केली आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर, हिरव्यागार डोंगरांमध्ये आणि शांत गावांमध्ये फिरण्याचा आनंद काही औरच असतो. पण, जर तुमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा सदस्य, तुमचा पाळीव प्राणी, तुमच्यासोबत नसेल, तर आनंद अपूर्ण वाटतो. "नो पेट्स अलाऊड" (No Pets Allowed) च्या सूचना वाचून तुमची निराशा होते का? काळजी करू नक. पाळीव प्राण्यांसोबत गोव्याच्या सहलीचा आनंद घेण्यासाठी आम्ही काही खास ठिकाणांची यादी तयार केली आहे.

आर्को इरिस

कुडतरी या शांत गावात वसलेले 'आर्को इरिस' हे २०० वर्षे जुने पोर्तुगीज घर आहे. ७,००० चौरस फुटांच्या या प्रशस्त घरात ५ बेडरूम, लायब्ररी आणि मोठी बाग आहे. विशेष म्हणजे, इथे तुमच्या पाळीव प्राणी देखील आणले तरीही चालतात.

विशेष म्हणजे इथल्या मालकाचा 'फेनी' नावाचा लॅब्राडोर तुमच्या पाळीव प्राण्यांना नक्कीच आवडेल. इथे तुम्हाला कोंबड्या आणि गाईसुद्धा दिसतील, त्यामुळे हे ठिकाण प्राण्यांसाठी स्वर्गच आहे.

कासा मेनेजेस

बेतीमध्ये असलेले 'कासा मेनेजेस' हे ३०० वर्षे जुने घर आहे. हे मेनेजेस कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असून, आता हेरिटेज होमस्टेमध्ये रूपांतरित झाले आहे. इथे एसी रूम, वाय-फाय आणि सायकल भाड्याने मिळण्याची सुविधा आहे. तुमच्या पाळीव प्राण्यांसाठी इथे 'केनेलिंग' सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही बाहेर फिरताना त्यांच्या काळजी किंवा चिंता करण्याची गरज नसते.

मंगळ फार्मस्टे

नेत्रावळी वन्यजीव अभयारण्याच्या जवळ असलेले 'मंगळ फार्मस्टे' तुम्हाला निसर्गाच्या जवळ घेऊन जाते. हिरवीगार झाडे आणि विविध प्राणी-पक्षी इथे आहेत. इथे तुम्हाला आदिवासी जीवनाचा अनुभव घेता येतो. इथे तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांसोबत निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

गोव्यात पाळीव प्राण्यांसोबत फिरताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

  • तुमच्या पाळीव प्राण्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.

  • त्यांच्यासाठी आवश्यक असलेले अन्न आणि औषधे सोबत ठेवा.

  • स्थानिक पशुवैद्यकांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक जवळ ठेवा.

  • स्थानिक नियम आणि कायद्यांचे पालन करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT