Vishwajit P Rane Dainik Gomantak
गोवा

Pernem Zoning Plan: अखेर पेडणेचा झोनिंग प्लान स्थगित, मंत्री राणे म्हणतात माझे चारित्र्य वेगळे

वादग्रस्त ठरलेला पेडणेचा झोनिंग प्लान स्थगित करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Pernem Zoning Plan: वादग्रस्त ठरलेला पेडणेचा झोनिंग प्लान स्थगित करण्यात आला आहे. केंद्रीय नेतृत्व आणि मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करुन स्थगितीचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.

सर्वांशी चर्चा केल्यानंतर प्लान स्थगित करण्यात आला आहे, तसेच केंद्राशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल. मी पूर्वीच्या नगरनियोजन मंत्र्यांसारखा नाही, माझे चारित्र्य वेगळे आहे, असे विश्वजीत राणे म्हणाले.

विकासापासून दूर असलेल्या पेडणे तालुक्याचा जमीन रूपांतर आराखडा (झोनिंग प्लॅन) तब्बल 20 वर्षांनंतर खुला करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना आपल्या हक्काच्या जमिनीमध्ये विकासाची कोणतीच कामे करता येत नाहीत.

शिवाय सरकारी प्रकल्पही रखडले आहेत. याकरिताच नगरनियोजन खात्याने तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली हा मसुदा तयार केला आहे.

तो तालुक्यातील प्रत्येक पंचायतीला पाठवण्यात आला असून नागरिकांना पाहण्यासाठी तो खुला केला आहे. या आराखड्यात रस्ते, बगलरस्ते, प्रकल्प रस्ते, धार्मिक स्थळे, सार्वजनिक वापराच्या जागा, उद्याने यांसाठी योग्य ते बदल करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT