BJP Dainik Gomantak
गोवा

मंत्रिपदासाठी पेडणेवासीय आक्रमक

आमदार प्रविण आर्लेकर यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज

दैनिक गोमन्तक

पणजी: निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपचा उमेदवार निवडून द्या, पेडण्याला मंत्रीपद देऊ, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, आमदार प्रविण आर्लेकर यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले होते. खाते वाटप जाहीर झाल्यावर त्यांनी सरळ पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर धडक दिली. पेडण्याला मंत्रिपद द्या आणि आश्‍वासनाची पूर्ती करा, असा आग्रह धरला. सुरवातीला त्यांना मुख्यमंत्री भेटले नाहीत. अखेर भाजप नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना नवे आश्‍वासन देऊन शांत करण्यात आले.

पहिल्या मंत्रिमंडळात पेडण्याला स्थान देण्यात आले नाही. तिथूनच नाराजीला सुरवात झाली होती. आता उरलेल्या तीन रिक्त मंत्रिपदांमध्ये आर्लेकर यांना स्थान नसल्याचे संकेत मिळाल्याने आर्लेकर समर्थक आधिकच आक्रमक बनले. अगोदर या कार्यकर्त्यांनी दुपारी पेडणे येथे सभा घेत सरकारवर टीका केली आणि तिथून सरळ मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्याची वाट धरली. मुख्यमंत्री व्यस्त असल्याचे सांगत त्यांची भेट नाकारण्यात आली.

त्यामुळे नाराज झालेल्या समर्थकांनी पत्रकारांकडे व्यथा मांडली. अखेर मुख्यमंत्र्यांनी या कार्यकर्त्यांची भेट घेऊन अजून मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे, आर्लेकर यांना मंत्रीपद मिळू शकेल किंवा महत्वाचे महामंडळही मिळेल, असे नवे आश्‍वासन दिले. तसेच मंत्री न बनताही जनतेचा विकास करता येतो. यापुढेही आमचे सरकार विकासासाठी प्रयत्नशील राहील असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT