Assembly Session Dainik Gomantak
गोवा

Assembly Session: लोकप्रतिनिधींनी दूरदृष्टी ठेवावी

Assembly Session: मुख्यमंत्री : आर्लेकरांकडून पेडण्यासाठी उड्डाणपुलांची मागणी

दैनिक गोमन्तक

Assembly Session: पेडण्यात उड्डाणपुलांना स्थानिकांनीच विरोध केल्याने तो प्रस्ताव बारगळला. आता स्थानिकच उड्डाणपूल हवा, अशी मागणी करत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर सर्वकाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठरवते. त्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.

लोकप्रतिनिधींनी जनभावनांची कदर करतानाच दूरदृष्टीने विचार केला पाहिजे. केवळ लोकांना हवे ते देऊ, असा विचार केल्यास धारगळसारखी परिस्थिती निर्माण होते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेत नमूद केले.

शून्य तासाला पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या उड्डाणपुलांची मागणी केली. ते म्हणाले, धारगळ व न्हयबाग येथे उड्डाणपुलांची गरज आहे. अपघात होऊन हातपाय मोडून अनेकजण घरात आहेत. काहींना जीव गमावावा लागला आहे. विमानतळामुळे वाहतूक वाढली आहे. त्यामुळे उड्डाणपुलांची गरज आहे.

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले, पर्वरी ते गिरी या टप्प्यात वाहतूक कोंडी होत आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पर्वरीच्या उड्डाणपुलाचे काम करताना वाहतूक वळवण्यात येईल. त्यासाठी रस्त्याशेजारी सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्यात येतील असे नमूद केले.

‘त्या’ कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा लाभ : मोन्सेरात

कामगार राज्य विमा योजनेच्या मडगाव इस्पितळात सध्या अर्धवेळ आणि पूर्णवेळ या पद्धतीने अल्प मोबदल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा लाभ देत कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येईल. आणखीन १०१ पदे कंत्राटी पद्धतीने भरली जातील. यामुळे त्या इस्पितळात चांगली सेवा देता येणे शक्य होणार असल्याचे कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी शुक्रवारी विधानसभेत नमूद केले. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी याविषयी प्रश्न विचारला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT