Pernem  Dainik Gomantak
गोवा

Goa Made Liquor Seized: पत्रादेवी येथे पकडली लाखोंची दारू; बेकायदा वाहतूक

Goa Made Liquor Seized: एकूण ८१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News :

पेडणे, पत्रादेवी चेकनाक्यावर आज बुधवारी सकाळी पेडणे अबकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नॅशनल परमिट ट्रकची झडती घेतली असता ४२ लाख ६३ हजार रुपयांची बेकायदा दारू सापडली.

हा मद्यसाठा आणि ट्रक असा एकूण ८१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला. तसेच चालक धर्मेंद्र अरीवार याची अटक करून नंतर सुटका केली.

मिळालेल्‍या सविस्‍तर माहितीनुसार, पत्रादेवी चेकनाक्यावर आज सकाळी एक ट्रक (एमएच ४० सीडी १८०१) ट्रक आला. ड्युटीवरील अबकारी अधिकाऱ्यांनी या ट्रकची तपासणी केली असता त्यात बेकायदा मद्यसाठा आढळून आला.

जप्‍त केलेल्‍या दारूमध्ये व्होडका प्रत्येकी १२ बाटल्यांच्या नगाप्रमाणे ४४० पेट्या (किंमत ३१ लाख ६८ हजार), व्होडका लहान आकाराच्या प्रत्येकी १८० पेट्या (किंमत ६ लाख ४८ हजार), किंगफिशर बीअरच्‍या १४ पेट्या (किंमत ३ लाख ४५ हजार), टुबर्ग बीअर ५० पेट्या (किंमत १ लाख २ हजार) असा समावेश होता. तसेच या दारूची वाहतूक करणारा ट्रकही जप्‍त घेण्‍यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT