Teacher Molested Student In Morjim, Pernem Dainik Gomantak
गोवा

Teacher Molested Student: विद्यार्थिनीचे अपहरण करुन विनयभंग; मोरजीतील शिक्षकाविरोधात गुन्‍हा

संशयित आणि विद्यार्थिनी यांच्यात इंस्टाग्राम, व्हॉट्स-अॅपवर चॅटिंग सुरू होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Teacher Molested Student In Morjim, Pernem

मोरजी, पेडणे मतदारसंघातील एका सरकारी शाळेतील क्रीडा प्राधिकरण प्रशिक्षकाने त्याच हायस्कूलच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मोपा पोलिसांनी त्‍याच्‍याविरोधात भारतीय दंडसंहितेच्‍या ३६३, ३५४, ३७६ कलमांनुसार तसेच गोवा बालकायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, शूटिंग बॉलचे प्रशिक्षण देणारा क्रीडा प्राधिकरण विभागाचा एक शिक्षक या हायस्कूलमध्ये मागच्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शूटिंग बॉलचे प्रशिक्षण देत आहे.

त्या हायस्कूलमध्‍ये आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुलीच्‍या आईवडिलांनी पोलिसांत दाखल केल्‍यावर तपासाची चक्रे फिरली. संशयित आणि विद्यार्थिनी यांच्यात इंस्टाग्राम, व्हॉट्स-अॅपवर चॅटिंग सुरू होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, हे प्रकरण दडपण्‍यासाठी राजकीय दबाव वाढत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोषीविरोधात योग्य कारवाई केली नाही तर पोलिस स्टेशनवर धडक देण्‍यचा इशारा पालकांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT