Pernem Water Problem Dainik Gomantak
गोवा

दाद कुणाकडे मागावी? पेडणेत पाण्यासाठी महिलांची वणवण

पाण्‍याचा शोध घेणे हाच नित्‍यक्रम

दैनिक गोमन्तक

मोरजी : पेडणे नगरपालिका क्षेत्रात पाण्‍याची समस्‍या दिवसेंदिवस उग्र होत चालली आहे. ‘कोणी पाणी देता का पाणी’ असे म्‍हणत वणवण भटकण्‍याची वेळ लोकांवर विशेषत: महिलांवर आलेली आहे. काही महिलांनी डोळ्‍यांत पाणी आणून सांगितले की, डिसेंबर महिन्यापासून नळांना पाणीच आलेले नाही. सकाळी उठल्‍यापासून पाण्‍याचा शोध घेणे हाच आता आमचा नित्‍यक्रम झालेला आहे.

भिरोणे, सरमळे, मयेकरवाडा या भागातील ही स्‍थिती आहे. एका बाजूने पेडणे तालुक्यात सरकार आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोपा विमानतळ, कॅसिनो, आयुष हॉस्पिटल, क्रिकेट स्टेडियम व इतर प्रकल्प आणू पाहत आहेत. त्‍यातील बहुतांश प्रकल्‍पांचे काम पूर्णही होत आलेले आहे. या प्रकल्पांसाठी (Project) पाण्याची वेगळी व्यवस्था अजून करण्‍यात आलेली नाही.

दुसऱ्या बाजूने चांदेल जलप्रकल्पातून येणारे पाणी सर्व पेडणेवासीयांना मिळतेच असे नाही. कधी पाणी येईल याचा नेम नसतो. जागरण करूनही नळांना पाण्याचा थेंब येत नाही. पाणी मिळत नसल्याने महिलांच्‍या डोळ्‍यांत अक्षरश: पाणी येत आहेत. आम्ही कुणाकडे दाद मागावी? टँकर आला तरी उंचीवर असलेल्या घरापर्यंत पाणी कसे नेणार? असे सवाल त्‍यांनी उपस्‍थित केले आहेत.

पेडणे (Pernem) पालिका क्षेत्रातील पाण्याच्या समस्येकडे आजपर्यंत कुणीच गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. पालिका आणि विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) उमेदवारांनी पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्‍यातील काहीजण नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्षही झाले. मात्र पाण्‍याची समस्‍या ‘जैसे थे’ आहे. आता नवीन आमदार काय करतो ते पाहू, अन्‍यथा तीव्र आंदोलन करण्‍याशिवाय आमच्‍याकडे पर्याय नाही, असा इशारा ग्रामस्‍थांनी दिला आहे.

एका महिलेने रडत रडत सांगितले की, मागच्या वेळी आम्‍ही पाणीपुरवठा (water) खात्याच्या अधिकाऱ्यांकडे कैफियत मांडली होती. त्‍यानंतर सलग पाच दिवस पाणी आले. मात्र नंतर पाण्याचा पत्ताच नाही. अधिकाऱ्यांना फोन केले तर ‘यांना फोन करा, त्‍यांना फोन करा’ असे सांगितले जाते. त्याचा फोन लागला तरी ते घेत नाहीत. आम्ही कुणाकडे दाद मागावी? माझी आई वयोवृद्ध आहे. तसेच आमची घरे उंचावर असल्याने टँकरचे पाणी वरपर्यंत कसे नेणार, असे सवाल तिने उपस्‍थित केले. या भागातील महिला सरमळे येथील माऊली मंदिर परिसरात पारंपारिक झर आहे त्या झरीचे पाणी दूरवर जावून ही महिला आणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT