Pernem : अडीच महिन्‍यांपासून कचऱ्याच्या साम्राज्यात पेडणेकरांचे वास्तव्य..! Dainik Gomantak
गोवा

अडीच महिन्‍यांपासून कचऱ्याच्या साम्राज्यात पेडणेकरांचे वास्तव्य..!

कचरावाहू ट्रकांशी असलेला करार संपल्याने जळीस्‍थळी कचऱ्याच्‍या राशी दृष्‍टीस पडत आहेत.

दैनिक गोमन्तक

पेडणे Pernem : तालुक्यातील कचऱ्याची उचल गेल्‍या अडीच महिन्‍यांपासून थांबल्‍याने मोठी समस्‍या निर्माण झाली आहे. साळगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा कचरावाहू ट्रकांशी असलेला करार संपल्याने जळीस्‍थळी कचऱ्याच्‍या राशी दृष्‍टीस पडत आहेत. काही ग्रामपंचायत कार्यालयांजवळच कचरा भरलेल्‍या पिशव्‍या पडून आहेत तर गावागावांमध्‍ये कचऱ्याची परस्पर विल्हेवाट लावण्याची वेळ लोकांवर आलेली आहे.

पेडणे तालुक्यात एकूण 20 ग्रामपंचायती आहेत. त्यातील हरमल, मांद्रे व मोरजी या किनारी भागात पर्यटन व्यवसायामुळे कचरा जास्त प्रमाणात निर्माण होतो. या तिन्ही पंचायतींनी आपापल्या पंचायत क्षेत्रातील कचरा नेण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. मात्र उर्वरित 17 ग्रामपंचायतींना अपयश आले आहे. या पंचायतींतर्फे नेमण्यात आलेले कर्मचारी ठरावीक दिवशी वाड्यावाड्यावर जाऊन लोकांनी घरात गोळा करून ठेवलेला कचरा पिशव्‍यांत भरतात व ग्रामपंचायत कार्यालयाजवळील जागेत किंवा जेथे सोय केलेली आहे तेथे आणून ठेवतात.

ट्रकभर कचरा झाल्यावर ग्रामपंचायतीकडून साळगाव कचरा प्रकल्पाला कळविले जात व तेथून ट्रक येऊन हा कचरा नेत असत. पण गेल्‍या सप्टेंबर महिन्यापासून चतुर्थीनंतर साळगाव प्रकल्पाचा कचरावाहू ट्रकांबरोबर असलेला करार संपल्याचे व नवीन करार न झाल्याने पेडणे तालुक्यातील कचरा तसाच पडून आहे.

दरम्‍यान, गावातील काही लोक कचरा जाळून टाकतात किंवा उघड्यावर फेकून देतात. कचरा जाळल्याने प्रदूषणात भर पडत आहे तर उघड्यावर टाकल्याने रोगराई पसरण्याची भीती व्‍यक्त केली जात आहे. ही समस्‍या लवकर मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: धुरंधरमध्ये 'पाकिस्तानी गाणं'! सिंगर हसननं केला मोठा खुलासा; निर्मात्यांनी 55 लाख दिल्याचा केला दावा

PAK vs BAN: "...मग आता ट्रॉफी चोरुन आणणार का?" PCB प्रमुखांच्या 'त्या' कृत्यावरुन अकमलनं उडवली खिल्ली; बांगलादेश मालिका गमावल्याचा काढला राग

Dhurandhar 2: बॉक्स ऑफिसचा नवा सुलतान! रिलीजआधीच 'धुरंधर 2' ची 119 कोटींची कमाई; 'जवान' अन् 'RRR' ला सोडले मागे VIDEO

Middle East War: मध्यपूर्वेतील युद्धाबाबत 'भ्रामक' पोस्ट करण पडलं महागात, युएईमध्ये 19 भारतीयांसह 35 जण जेरबंद; सुटकेची आशा धूसर

'जंगल हे उपासनेचे ठिकाण आहे आणि धबधबे ध्यान करण्याची जागा'! गोव्यातील वाढणारी कचरासमस्या आणि दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT