Pernem  Dainik Gomantak
गोवा

Pernem News : पेडणे येथे आधार सेवा केंद्राचे उद्‍घाटन

Pernem News : आधार सेवा केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी पेडणे नगरपालिकेने घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News :

पेडणे, तालुक्याच्या ठिकाणी आधार सेवा केंद्र झाल्यामुळे लोकांना चांगली सेवा मिळून लोकांचा वेळ व खर्च वाचणार आहे. आधार सेवा केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी पेडणे नगरपालिकेने घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे.

पेडणे तालुक्यातील जनतेने या आधार सेवा केंद्राचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पेडणे येथे बोलताना केले. पेडणे नगरपालिकेत सुरू केलेल्या आधार सेवा केंद्राचे त्यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष अश्विनी पालयेकर, शिवराम तुकोजी, मनोज हरमलकर, विशाखा गडेकर, राखी कशालकर, उषा नागवेकर, तृप्ती सावळ देसाई व ग्रामस्थ उपस्थित होते.

नगराध्यक्ष सिध्देश पेडणेकर म्हणाले, पेडणे हा तालुक्याचे मुख्य ठिकाण असूनही बाल कल्याण कार्यालयात सोय होती. तिथे तारखा दिल्या जात असल्याने लोकांना अनेकदा खेपा माराव्या लागत होत्या.

तर हे कार्यालय दुसऱ्या मजल्यावर असल्याने वयस्कर लोकांना पायऱ्या चढताना त्रास व्हायाचे. इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडला आम्ही विनंती करून एक खोली उपलब्ध करून हे आधार सेवा केंद्र सुरू केले आहे. त्यात नवीन आधार कार्ड, आधारकार्ड मधील दुरुस्ती आदी कामे होतील. याचा लाभ पेडणे तालुक्यातील जनतेला होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT