Mopa Airport  Dainik Gomantak
गोवा

मोपा लिंक रोडसाठी 7218 झाडे तोडण्यास परवानगी

नैसर्गिक ऱ्हास टाळण्यासाठी 21,654 रोपे लावण्याच्या दिल्या सुचना

दैनिक गोमन्तक

मोपा विमानतळ लिंक रोडच्या बांधकामासाठी उप वनसंरक्षकांनी परवानगी दिली आहे. यासाठी काजू, आंबा आदींसह शेकडो फळझाडे काढली जात आहेत. मात्र पिडीत शेतकऱ्यांनी यापूर्वीच न्यायालयात धाव घेऊन लिंक रोडचे काम थांबवण्याची मागणी केली होती. राजकारण्यांच्या हस्तक्षेपासह अनेक कारणांमुळे या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. (Permission to cut down 7218 trees for Mopa Link Road)

शेतकऱ्यांनी या प्रकल्पास विरोध केला आणि भूसंपादन अधिकाऱ्यांसह जमीन साफ ​​करणे थांबवण्यास सांगितले, तेव्हा संबंधित अधिकाऱ्याने पोलिसांना आंदोलकांना अटक करण्यास सांगितल्याची बाब समोर आली आहे.

मोपा लिंक रोड पिडीत क्षेतकरी समितीचे अध्यक्ष संदिप कांबळी याबाबत म्हणाले की, "आम्ही अधिकाऱ्यांना वृक्षातोड थांबवण्यास सांगितले, तेव्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला न्यायालयाचा आदेश किंवा कायदेशीर कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. तोपर्यंत काम सुरूच राहणार असे सांगितले. पण आम्हाला वाटते की हा प्रकल्प सुरु ठेवण्यासाठी सरकार आणि राजकारण्यांचा सहभाग आहे.

कारण हे प्रकरण अद्याप सुनावणीसाठी प्रलंबित आहे. तसेच गोवा जमीनीवर शेतकर्‍यांची नावे अजूनही आहेत. तरी ही सरकार या प्रकल्पाचे कामा जोमाने सुरु आहे हे काम पूर्णपणे बेकायदेशीर आहे. असे शेतकऱ्याने सांगितले. तसेच आमची जमीन हडपण्याचा हा डाव आहे. कोर्टाने या कामावर तात्काळ स्थगिती द्यावी, अशी विनंती आम्ही करतो," असे शेतकरी यावर बोलताना म्हणाले.

या प्रकल्पासाठी रस्ता मोकळा व्हावा यासाठी संपूर्ण वृक्षारोपण नष्ट केले जात आहे. याबाबत कोणताही अधिकार नसताना वृक्ष राजरोसपणे नष्ट करून जमीन मोकळी केली जात आहे. याच कधी ही समर्थन केले जाऊ शकत नाही असे ही काही शेतकरी यावर बोलताना म्हणाले.

या कामाला शुक्रवारी सुरुवात झाली. तेव्हापासून आम्ही त्यांना काम बंद करून स्थगिती आदेश काढण्यासाठी वेळ द्या, असे सांगत आहोत. मात्र एकही अधिकारी आमचे म्हणणे ऐकायला तयार नाही. ही संपूर्ण छळवणूक आहे,” असे आणखी एका शेतकऱ्याने सांगितले. त्यामूळे आदेश जरी जारी झाले असले तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे पुढे काय होणार हा प्रश्न अद्याप प्रश्नच राहीला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT