Bad Roads in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: रस्त्यांची दुरवस्था सांगण्यासाठी गोवा सरकारने सुरु केलेल्या अ‍ॅपला लोकांचा उदंड प्रतिसाद

Goa: एका तासात 260 लोकांनी पाठवली खड्ड्यांची छायाचित्रे

दैनिक गोमन्तक

Goa: रस्त्यांवरील खड्डे व स्थितीबाबत माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने पीडब्ल्यूडी ॲप सुरू करताच तासाभरात 15 ठिकाणांहून सुमारे 260 लोकांनी रस्त्यांची छायाचित्रे पाठविली, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

लोकांना रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यांची स्थिती यासंदर्भातील छायाचित्रे पाठवण्यासाठी सरकारने ॲप सुरू केले आहे. ज्या भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, ती वेळेत दुरुस्त न केल्यास त्या भागातील बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता, साहाय्यक अभियंता, साबांखा अधिकारी तसेच कंत्राटदार यांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

अशाच प्रकारचे एक ॲप राज्यातील पाणी समस्या, सांडपाणी निचरा व गळती यांची माहिती देण्यासाठी पुढील वर्षात सुरू करण्यात येणार आहे. तक्रारींसाठी लवकरच एक फोन क्रमांकही उपलब्ध करण्यात येणार आहे.

अभियंत्यांना रस्त्यांच्या या तक्रारी सोडवण्यासाठी 24 तास काम करावे लागेल. जर त्यांना शक्य नसेल तर राजीनामा देऊन घरी जावे, असा सक्त इशारा काब्राल यांनी दिला.

मंत्री काब्राल यांच्या हस्ते पाण्याची थकित बिले भरण्यासाठी एकाचवेळी रक्कम जमा करण्याच्या (ओटीएस) ॲपचे उद्‍घाटन करण्यात आले. सुमारे 92.15 कोटींची बिले थकीत आहेत.

या ॲपवर नोंदणी करणाऱ्या ग्राहकांनाच 1 फेब्रुवारी 2023 पासून या योजनेचा मिळणार आहे. त्यानंतर पुन्हा ही योजना लागू करणार नाही. तसेच थकित बिल असलेल्या ग्राहकांचे कनेक्शन बंद केले जाईल, असे काब्राल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

Imran Khan: भारतीय दिग्गजांचा पाकिस्तानला 'बाऊन्सर'! इम्रान खानच्या मदतीला धावले कपिल देव अन् सुनिल गावस्कर; सरकारकडे केल्या 'या' 3 मागण्या

SCROLL FOR NEXT