Goa Floods Dainik Gomantak
गोवा

Goa Floods: घरात पाणी घुसल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

सावर्डे येथील जुवारी नदीला पूर(Goa Floods) आल्याने मिरबाग व धडे येथील घरात पाणी शिरले

दैनिक गोमन्तक

केपे: मुसळधार पाऊसमुळे राज्यातील सर्व नद्यांना पूर (Goa Floods) आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल दिवसभर व रात्री पडलेल्याजोरदार पाऊसमुळे सावर्डे येथील जुवारी नदीला पूर आल्याने मिरबाग व धडे येथील घरात पाणी शिरल्याने सदर कुटुंबातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. (People were migrated due to floods in Goa)

काल दिवसभर अतिवृष्टी झाल्याने राज्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत आल्याने नदीकाठी असलेल्या कुटुंबाना धोका निर्माण झाला आहे. धडे सावर्डे येथे आज सकाळी सुमारे पाच वा. रुतेश भंडारी व बाबय नाईक यांच्या घरात पाणी शिरल्याने दोन्ही कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले परंतु घरातील किमती व विजेवर चालणाऱ्या वस्तू घरातच राहिल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दोन्ही कुटुंबीयांनी सांगितले. पहाटे पाच वाजता हा प्रकार घडल्याने कुटुंबियांची एकच तारांबळ उडाली यावेळी गावातील लोकांनी लहान मुलांना व काही प्रमाणात समान बाहेर काढण्यास मदत केल्याचे लोकांनी सांगितले.

मिरबाग व धडे येथील घरात पाणी शिरले

मिराबाग येथील पुलाजवळ उभे करून ठेवलेले दोन ट्रक पूर्णपणे पाण्याखाली गेले त्याचप्रमाणे गणपती विसर्जनासाठी बांधण्यात आलेली शेड दोन रूम देवाची घुमटी एक पंप हाऊस मिळून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्थानिक पंच संजय नाईक यांनी सांगितले. सदर पुलाखाली सुमारे सात ट्रक उभे करून ठेवण्यात आले होते पण रात्री पाणी वाढत चालल्याने काहींनी आपले ट्रक बाहेर काढले पण दोन ट्रक गेल्या एक वर्षांपासून बंद असल्याने ते सुरू करता न आल्याने ते पाण्याखाली गेल्याचे संजय नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: “लिटल फॅट, ब्लॅक शर्ट”! नाव, टेबल नंबर सोडून थेट बॉडी-शेमिंग; बंगळुरुमधील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या कारभारानं खळबळ

Mhadei Water Dispute: 'म्हादईला आई म्हणणे सोपे, वाचविणे कठीण'; न्यायालयीन लढ्यात सरकारची उदासीनता! राजेंद्र केरकर यांची टीका

Myanmar Military Airstrike: म्यानमारमध्ये लष्कराचा बौद्ध मठावर भीषण हवाई हल्ला! 14 जणांचा मृत्यू; 20 गंभीर जखमी

Saligao Constituency: साळगाव मतदारसंघामध्ये चुुरस, जयेश साळगावकर यांचा राजीनामा; केदार नाईकांपुढे पेच

Illegal Night Clubs: 'टिटोज लेन'वरील 17 नाईट क्लब्स रडारवर; आणखी 4 क्लबवर कारवाई, बेकायदा बांधकामांवर हातोडा

SCROLL FOR NEXT