Minister Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Kala Academy Row: फळे असलेल्या झाडावरच लोक दगड मारतात; मंत्री गोविंद गावडे

टेंडरचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतल्याचे स्पष्टीकरण; भाजप प्रवक्ता रॉड्रिग्ज यांच्याकडून आपल्याच मंत्र्यांवर टीका

गोमन्तक डिजिटल टीम

Govind Gaude On Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी कंत्राटदार निवड निर्णयाच्या वादातून आरोप झाल्यानंतर आता कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. फळे लागलेल्या झाडावरच लोक दगड मारतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी याबाबत दिली.

मंत्री गावडे म्हणाले की, कला अकादमीच्या कामाच्या नामांकन आणि टेंडरबाबतचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला होता. असे असतानाही मला लक्ष्य करून टीका केली जात आहे. जेव्हा एखाद्या झाडाला फळे लागतात तेव्हा त्याच झाडावर लोक दगड मारत असतात, असे गावडे म्हणाले.

दरम्यान, अकादमीच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे, हे मीच कशाला लहान मुलगाही सांगेल. मी दक्षता खात्याच्या अहवालानुसार भाष्य केले आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ता सावियो रॉड्रिग्ज यांनी केली आहे. रॉड्रिग्ज हे स्वतः भाजपचे असूनही त्यांनी भाजप सरकारमधील मंत्र्यांवर टीका केल्याने हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

तर मंत्री गोविंद गावडे यांनी, कोण सावियो रॉड्रिग्ज? मी त्याला ओळखत नाही, असा पलटवार रॉड्रिग्ज यांच्यावर केला आहे.

या प्रकरणात गुरूवारीच कला व संस्कृती तसेच सार्वजनिक बांधकाम या दोन्ही खात्यांच्या मंत्र्यांनी आपली जबाबदारी झटकली होती. टेकटॉन कंपनी या कंत्राटदाराच्या निवडीचा निर्णय कला व संस्कृती खात्यानेच घेतला होता, असा पलटवार सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी मंत्री गावडे यांच्यावर केला होता.

तथापि, कला अकादमीच्या दुरुस्ती व देखभालीचे काम नेहमीच सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे केले जाते. या कामाशी कला व संस्कृती खात्याचा काडीचाही संबंध नसल्याचे वक्तव्य मंत्री गोविंद गावडे यांनी केले होते. कला अकादमीची इमारत जरी कला व संस्कृती खात्याच्या अखत्यारित येत असली तरी तिच्या नूतनीकरणाचा निर्णय ‘साबांखा’नेच घेतला होता, असे सांगून गावडे यांनी आपल्या खात्यावरील जबाबदारी झटकली होती.

कला अकादमी नूतनीकरणाचे कंत्राट देण्याच्या प्रक्रियेत कायदेशीर बाबींचे उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष काढून दक्षता खात्याने चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती कऱण्याची शिफारस केली आहे. पण महिना उलटत आला तरी त्यावर दक्षता खात्याचे मंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अजूनही कोणताच निर्णय घेतलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT