Goa Fungus in Ration Rice Dainik Gomantak
गोवा

Goa Fungus in Ration Rice: सांगेत अधिकाऱ्यांच्या टेबलवर लोकांनी ओतले सडलेले तांदूळ; अधिकारी नरमले

खराब तांदूळ परत घेऊन दुसरा देण्याची ग्वाही

दैनिक गोमन्तक डिजिटल

सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणारे तांदूळ सडलेले आणि अळ्या निर्माण झालेले असल्यामुळे संतापलेल्या वाडे-कुर्डीतील नागरिकांनी आज सकाळी नागरी पुरवठा अधिकाऱ्यांच्या सांगे येथील कार्यालयात येऊन सडलेले तांदूळ टेबलवर ओतले.

याबाबत लोकांनी स्पष्टीकरण मागितल्यानंतर यापुढे असा प्रकार घडणार नसल्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर नागरिकांनी परत जाण्याचा निर्णय घेतला.

सविस्तर माहितीनुसार, शिधापत्रिकेवर दिलेल्या तांदळात अळ्या निर्माण झाल्या होत्या. तो तांदूळ बदलून देण्यास दुकानदाराने नकार दिल्याने नागरिकांनी थेट सांगे येथील नागरी पुरवठा खात्याचे कार्यालय गाठून सडलेले व अळ्या निर्माण झालेले तांदूळ अधिकाऱ्यांच्या टेबलवर ओतले.

यापूर्वी सडलेले तांदूळ दिल्याच्या तक्रारी येत होत्या; पण त्यात सुधारणा होत नसल्याने अखेर नागरिकांनी खात्याच्या कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला. पंचायत सदस्य चंदन उनंदकर आणि जुझेफिना फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून केवळ वाडे-कुर्डीतील नागरिकांना सडलेले तांदूळ का देता, असा प्रश्न विचारला.

खराब तांदूळ बदलून देऊ, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी हा प्रकार उघडकीस आल्यामुळे नागरी पुरवठा खात्याच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT