Free Gas Cylinders in Goa Dainik Gomantak
गोवा

Free Cylinder in Goa : मोफत गॅस सिलिंडर योजनेला मुहूर्त कधी?

विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या 22 कलमी जाहीरनाम्‍यात वर्षाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना जाहीर केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Free Cylinder in Goa : विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या 22 कलमी जाहीरनाम्‍यात वर्षाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना जाहीर केली होती. सुरूवातीला सर्वांसाठी ही योजना असावी असे वाटत होते. परंतु नंतर पहिल्या टप्प्यात ती आर्थिक दुर्बल गटाला आणि त्यानंतर पाच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्‍यांना देण्याचे ठरले. गणेश चतुर्थीच्या अगोदर ही योजना मार्गी लागेल असे वाटत होते, पण तसे काही झाले नाही. आता दिवाळीपूर्वी तरी सदर योजना मार्गी लागून सामान्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

आर्थिक दुर्बल घटकांना पहिल्या टप्प्यात मोफत सिलिंडर देण्यात येतील, असे ग्रामीण विकासमंत्री गोविंद गावडे यांनी जाहीर केले होते. याविषयी विचारणा केली असता मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळणे बाकी असल्याने ती येत्या काही दिवसांत मिळेल, अशी माहिती त्‍यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

भाजप सरकार सत्तेवर येताच एप्रिलमध्ये झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना मार्गी लावण्‍याचा प्रयत्‍न झाला, परंतु आर्थिक मंजुरीसाठीची फाईल अद्याप मंजूर झालेली नाही. त्यामुळे या योजनेला मुहूर्त गणेशोत्सवात मिळेल, असे वाटत होते, पण ही अपेक्षा फोल ठरली.

मध्यंतरी सिलिंडर 1 हजार रुपयांवर पोचल्यानंतर मोफत सिलिंडर सरकार कधी मिळणार, असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला होता. त्यावेळी राज्य सरकारवर चौफेर टीका झाली होती. सरकार आता कोणता मुहूर्त साधणार हे बघावे लागेल.

132 कोटींचा बोजा

या योजनेचा फायदा 37 हजार शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. शिवाय ५ लाख रुपयांखालील वार्षिक उत्पन्नाचा मामलेदारांकडून आणलेला दाखला आवश्‍यक असेल. या योजनेपोटी राज्य सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 132 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT