Nilesh Cabral   Gomantak Digital Team
गोवा

Nilesh Cabral : विकासाबरोबरच लोकांच्या आरोग्यालाही प्राधान्य

कुडचडे मतदारसंघातील विकासकामांबरोबरच लोकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपला प्रयत्न आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Nilesh Cabral : कुडचडे मतदारसंघातील विकासकामांबरोबरच लोकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपला प्रयत्न आहे. त्यासाठी नैसर्गिक उपचार पद्धती वापरून उपचार करण्यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे, असे मंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.

ते कुडचडे येथे लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मॅग्नेटिक ट्रीटमेंट कॅम्पच्या उद्‌घाटन समारंभावेळी बोलत होते. यावेळी नगरसेवक टोनी डिकॉस्ता, विश्वास सावंत देसाई, सरपंच किस्तोदियो फेर्नांडिस, डॉ. हरीश ढगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या उपचार पद्धतीचे निष्कर्ष लगेच दिसून येत नाहीत, म्हणूनच हे शिबिर चाळीस दिवस चालणार असून लोकांनी या चाळीस दिवसांत नियमित येऊन उपचार घ्यावेत, असे या शिबिराचे प्रमुख डॉ. हरीश ढगे यांनी सांगितले.

लायन्स क्लबच्या सहकार्याने चाळीस दिवसीय नैसर्गिक उपचार पद्धतीच्या शिबिराचे आयोजन केले असून विकासकामांबरोबर लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आपला प्रयत्न आहे.

कुडचडे मतदारसंघातील लोकांनी या आरोग्य शिबिराचा फायदा घ्यावा; कारण ही उपचार पद्धती सहसा येथे मिळत नाही, त्यासाठी लोकांना दूरदूर जावे लागते.

नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाममंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT