Pay Increament in Cleaners & Drivers by Goa Government Dainik Gomantak
गोवा

Goa Government: सफाई कर्मचारी, वाहनचालकांसाठी गोवा सरकारतर्फे वेतनवाढ

गोवा सरकार (Goa Government) तर्फे या सफाई कर्मचाऱ्यांच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घनकचरा व्यवस्थापनात गुंतलेल्या सफाई कर्मचारी आणि वाहनचालकांच्या दैनंदिन वेतनात 200 रु.ने वाढ करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: गोवा हे राज्य इथल्या निसर्गामुळे आणि पर्यटनासाठी जितके प्रसिद्ध आहे तितकेच इथल्या सरकारी योजनांविषयी देखील आहे. गोव्याची सरकारी धोरणे इतर राज्यांसाठी नेहमीच एक उत्तम उदाहरण ठरत असतात. गोव्याचे सरकार इथल्या जनतेसाठी नेहमीच तत्पर असून नवनवीन जनहिताय योजना आणि उपक्रम राबवत असतात.

गोवा सरकारतर्फे (Goa Government) सफाई कर्मचाऱ्यांसाठी आणि वाहनचालकांसाठी (Drivers) काही खास योजना बनवण्यात आली आहे. सरकारतर्फे या सफाई कर्मचाऱ्यांच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घनकचरा व्यवस्थापनात गुंतलेल्या सफाई कर्मचारी आणि वाहनचालकांच्या दैनंदिन वेतनात 200 रु.ने वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर 30 रु. गट विमा योजनाही या कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आली आहे.

याबाबतचे परिपत्रक सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित कामात सहभागी असलेल्या सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना (सफाई कर्मचारी) आणि वाहनचालकांना प्रतिदिन रु. 700 रु. म्हणजे मनपा निधीतून रु. 500 रु. आणि रु. 200 रु. सरकारी अनुदानातून देण्यात येणार आहेत. शिवाय गट विमा योजना या कामगारांना आणि चालकांना देखील वाढवण्यात येणार आहे, ज्यामध्ये शासनाकडून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रति महिना रु. 30 रु. अनुदानाद्वारे जारी केले जातील. यासंदर्भात, 'आपली शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करणाऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल असल्याचे मत' मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT