Pay government honorarium in Goa immediately  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सरकारी मानधन तात्काळ द्या!

गरजू ज्येष्ठ नागरिकांची मागणी

दैनिक गोमन्तक

आगोंद: गोवा राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या गृहआधार आणि दयानंद सामाजिक योजनेचे मानधन काणकोण तालुक्यातील लाभार्थ्यांना गेल्या काही महिन्यांपासून मिळाले नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले आहेत. सरकारने ही रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी होत आहे.

काणकोण तालुक्यात 1,562 ज्येष्ठ नागरिक, 66 जण विशेष व्यक्तींच्या गटात; तर दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली 6 हजार लाभार्थी आहेत. या सर्वांना राष्ट्रीयकृत बँकांमार्फत आर्थिक मदत वितरित केली जात असून, रक्कम खात्यात जमा झाली की नाही, याची पडताळणी करण्यासाठी त्या सर्वांना बँकेमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत.

सर्व गरजवंताना सरकारकडून देय असलेली आर्थिक मदत गेल्या चार महिन्यांपासून मिळालेली नाही. ती त्वरित देण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी सरपंच सचिन नाईक यांनी केली. जनतेसाठी सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. महिनाकाठी ठरावीक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत होती. त्यामुळे ज्यांना कुणाचा आधार नाही, अशा नागरिकांना या योजनेचा चांगला लाभ होत होता. मात्र काणकोण तालुक्यातील लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून या योजनांचे पैसे मिळालेले नाहीत. काही ज्येष्ठ नागरिकांचे सरकारकडून मिळणाऱ्या पैशांवरच औषधोपचार अवलंबून असल्याचे ज्येष्ठ नागरिकांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले.

विधानसभा निवडणूक काळात सरकारकडून दिल्या जाणाऱ्या योजनांचे पैसे वाढवून देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पूर्वीचीच रक्कम मिळत नसल्याने गरजवंत त्रस्त झाले आहेत. किमान पूर्वीचेच मानधनतरी वितरित करा, अशी ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे. ‌

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT