Republic Day Dainik Gomantak
गोवा

Republic Day: पर्वरीत उद्या ‘बलसागर भारत होवो..!’

पर्वरीत भारतीय प्रजासत्ताकदिनी सदाबहार देशभक्तीपर संगीत कार्यक्रम होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Republic Day: भारतीय प्रजासत्ताकदिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता पर्वरी येथील आर्ट पार्कमध्ये ‘बलसागर भारत होवो...’ हा सदाबहार देशभक्तीपर संगीत कार्यक्रम होणार आहे.

नव्या पिढीला देशभक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी या कार्यक्रमाची आखणी व निर्मिती करण्यात आली आहे. दीपा क्रिएशन्सची प्रस्तुती असलेल्या या कार्यक्रमासाठी पर्वरी रायझिंग व स्वस्तिक संगीत संस्थेचे सहकार्य लाभले आहे. गोवा पर्यटन खात्यानेही या संगीत कार्यक्रमाच्या संकल्पनेला आधार व सहकार्याचा हात दिला आहे.

डॉ. प्रवीण गांवकर व साथी कलाकार या कार्यक्रमात रसिकांसाठी सदाबहार अशा देशभक्तीपर गीतांची मैफल घेऊन येणार आहेत. डॉ. गावकर यांचे गोव्यासह इतर राज्यातही अनेक संगीत कार्यक्रम झाले असून प्रत्येक कार्यक्रमाला रसिकांनी प्रचंड दाद दिली आहे.

या कार्यक्रमाला पर्यटन तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. पर्वरीच्या विद्या प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर हे सन्माननीय अतिथी म्हणून हजर राहतील.

हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून रसिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन दीपा क्रिएशन्सच्या दीपा प्रभुदेसाई यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT