Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: राज्य प्रदेश निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी पाटकर यांची नियुक्ती

Goa Politics: गिरीश चोडणकर, रमाकांत खलप यांचाही समावेश

दैनिक गोमन्तक

Goa Politics: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या राज्य प्रदेश निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी अमित पाटकर यांची नियुक्ती झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेनुसार ही नियुक्ती झाली असून एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी निवडीचे आदेशपत्र जारी केले आहे.

या समितीमध्ये पाटकर यांच्यासह अन्य नऊजणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात माजी प्रदेशाध्यक्ष तसेच एआयसीसीचे निमंत्रक सदस्य आणि चार राज्यांचे प्रभारी गिरीश चोडणकर यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे चोडणकर यांना गोव्यातील राजकारणावर लक्ष ठेवण्याची संधी मिळाली आहे. त्याशिवाय ते दक्षिण गोव्यातून निवडणूक लढविण्यासही इच्छुक आहेत.

उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास अनेकजण इच्छुक असल्याचे दिसून आले आहे. उत्तर गोव्यातून निवडणूक लढविण्यास इच्छा व्यक्त करणाऱ्या रमाकांत खलप यांचाही या समितीमध्ये समावेश आहे.

प्रदेश निवडणूक समिती अशी ः अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, खा. फ्रान्सिस सार्दिन, माजी मंत्री ॲड. रमाकांत खलप, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार कार्लोस फेरेरा, एम. के. शेख, डॉ. प्रमोद साळगावकर आणि शंभू भाऊ बांदेकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT