Cancona Health Center Issues Dainik Gomantak
गोवा

Canacona Dialysis Center: अरे देवा! काणाकोण आरोग्य केंद्रात डायलेसिस विभागात पाणीच नाही, तब्बल तीन तास मूत्रपिंड रुग्णांचा खोळंबा

Cancona Social Health Center: काणकोणात सुमारे १६७ मूत्रपिंड व्याधीने त्रस्त रुग्ण आहेत त्यापैकी सुमारे ८२ रुग्णांना डायलेसिस करावे लागते

गोमन्तक डिजिटल टीम

Cancona Health Center Problems

काणकोण: काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात मूत्रपिंड व्याधीने त्रस्त रुग्णांचे हाल होत आहेत. काणकोणात सुमारे १६७ मूत्रपिंड व्याधीने त्रस्त रुग्ण आहेत. त्यापैकी सुमारे ८२ रुग्णांना डायलेसिस करावे लागते. मात्र या रुग्णांना चांगली सेवा देण्यात आरोग्य खाते कमी पडत आहे.

राज्यातील सर्वाधिक ६० टक्के रुग्ण काणकोण तालुक्यात आहेत. त्याचसाठी आरोग्य खात्याने या केंद्रात डायलेसिस कक्ष सुरू केला. सकाळी ६ वाजल्यापासून या कक्षात डायलेसिस केले जाते. त्यासाठी दूरवरच्या रुग्णांना सकाळी पाच वाजताच उठून आरोग्य केंद्रात यावे लागते. डायलेसिस झाल्याशिवाय त्यांना काही खाता पिता येत नाही. मात्र, काहीवेळा डायलेसिस प्रक्रिया उशिरा सुरू करण्यात येत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

शनिवारी सकाळी ६ वाजता डायलेसिससाठी रुग्ण आले होते. डायलेसिस प्रक्रियेसाठी पाण्याची गरज असते. मात्र त्यादिवशी कक्षात पाणीपुरवठाच झाला नव्हता. ज्या जलकुंभातून पाण्याचा पुरवठा होतो, त्या जलकुंभातही पाणी नव्हते. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर सकाळी ९ वाजता डायलेसिस प्रक्रिया सुरू झाली. तोपर्यंत रुग्णांना ताटकळत रहावे लागले, असे आगोंद येथील गुरु बांदेकर व अन्य रुग्णांनी सांगितले. या आरोग्य केंद्रातील लिफ्ट कधी कधी चालत नसल्याने रुग्णांना डायलेसिस केल्यानंतर पायऱ्या उतरून जावे लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT