Goa Express Dainik Gomantak
गोवा

Goa Expressमध्ये प्रवाशांना घेता येणार गरमागरम जेवणाचा आस्वाद

रेल्वे सरकारने या 9 ट्रेनमध्ये गरम जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली

दैनिक गोमन्तक

ट्रेनमधून (Train) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासादरम्यान गरमागरम पदार्थांचा (Food) आस्वाद घेता येणार आहे. ट्रेनमध्येच ऑर्डर केल्यावर त्यांना गरम जेवण देण्याची सोय भारतीय रेल्वेने केली आहे. ही सुविधा गेल्या 18 महिन्यांपासून ट्रेनमध्ये बंद होती. मात्र आता ही सोय प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये फक्त रेडी टू इट असे पदार्थ मिळत होते. आता ही सुविधा फक्त त्या निवडक गाड्यांमध्ये उपलब्ध असेल, ज्यांना रेल्वे प्रशासनाने (Indian Railway) परवानगी दिली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांना गरम जेवण देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर गोवा एक्सप्रेसमध्ये देखील प्रवाशांना गरमागरम भोजनाचा आनंद घेता येणार आहे. रेल्वेने काही दिवसांपूर्वी ही सुविधा सुरू केली आहे.

अशा 9 ट्रेन भोपाळमधून जातील, ज्यामध्ये प्रवासी गरम जेवण खाऊ शकतील. कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने गरम अन्न खाण्याची व्यवस्था बंद केली होती. परंतु आता ट्रेनमध्ये गरम आणि पोषक अन्न मिळेल. यामध्ये तुम्हाला डाळी, भात, रोटी, वेगवेगळ्या भाज्या, मिठाई यासह इतर नियमीत पदार्थ मिळतील.

18 महिन्यांत ही सुविधा सुरू

पूर्ण 18 महिन्यांनंतर रेल्वे प्रवाशांना ताजे जेवण मिळणार आहे. संपूर्ण कोरोना प्रोटोकॉल नुसार ट्रेनमध्ये गरम अन्न बनवण्याचा दावा भारतीय रेल्वे कडून केला जात आहे. यामध्ये सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे आणि आता हळूहळू लोक ट्रेनमध्ये या पदार्थाचा आस्वाद घेऊ लागले असल्याची माहिती रेल्वेने दिली.

या 9 ट्रेनमध्ये मिळणार

रेल्वे सरकारने देशभरातील एकूण 71 ट्रेनमध्ये गरम जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यापैकी आता भोपाळमधून जाणाऱ्या या 9 गाड्यांपैकी जयपूर एक्सप्रेस, चेन्नई सेंट्रल जयपूर एक्सप्रेस, संपर्क क्रांती एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, पुरी जोधपूर एक्सप्रेस, निजामुद्दीन यशवंतपूर संपर्क क्रांती, शताब्दी एक्सप्रेस आणि कन्याकुमारी एक्सप्रेसमध्ये ताजे अन्न प्रवाशांना मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT