Students writing exam  Dainik Gomantak
गोवा

बारावीत एका गुणाने नापास झालेल्यांचा फेरविचार करा; पालकांची विनंती

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शालान्त मंडळाचा बारावीच्या परीक्षेचा काही दिवसापूर्वी निकाल जाहीर झाला. निकाल सर्वाधिक लागल्याने पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला आनंदाचे क्षण. पण, केवळ एका गुणाने नापास झालेल्यांची मात्र घोर निराशा झाल्याने मंडळाने फेरविचार करावा, अशी विनंती पालकांनी केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वारंवार मंडळाच्या पध्दतीमध्ये होणारा बदल ज्या होणाऱ्या बदलांची इत्यंभूत माहिती संबंधित विषयांचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना किंवा शाळाप्रमुखांनाही काहीवेळा नसते. बारावीच्या विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खास करून प्रॅक्टीकल असलेले विषय म्हणजे भौतिकशास्त्र (physics), रसायनशास्त्र (Chemistry), व जीवशास्त्रमध्ये (biology), थिअरी व प्रॅक्टीकलमध्ये वैयक्तिक स्‍वरुपात आवश्‍यक ते गुण मिळाल्यास विद्यार्थी पास होणार. सध्याच्या परिस्थितीनुसार सर्वसाधारणपणे विद्यार्थ्याला सरसकट विषयानुरुप 21 टक्के गुण मिळाले पाहिजे. या विषयामध्ये 70 गुणांच्या परीक्षेत पास होण्यासाठी 21 टक्क्यांप्रमाणे 15 गुण प्राप्त झाले पाहिजे.

पण अंतर्गत मूल्यांकनाचे 10 पैकी पाच गुण मिळून बेरीज केल्यास एकूण 19 गुण होतात. पण, तो विद्यार्थी पास होत नाही. केवळ एक गुण कमी पडल्याने तो नापास झालेला आहे. कारण गुण कंबाईन्ड जमेस धरलेले नाही. मुलांनी अंतर्गत परीक्षा दिल्या होत्या त्यानुसार ते अंतर्गत मूल्यांकन (Internal Marks) मंडळाला शाळेकडून डिसेंबर महिन्यामध्येच पाठवलेले असतात. त्या अंतर्गत मूल्यांकन गुणांचा मंडळाने विचार करावा, असे पालकांनी सांगितले.

एका गुणांसाठी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा पास होण्यासाठी नापास झालेल्या विषयात पुनः मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल. त्यासाठी परत मंडळाचा परीक्षा शुल्क भरावा लागेल. त्यासाठी यंदा प्रथम सत्र परीक्षा ही objective पध्दतीची 40 गुणांची किंवा 30 गुणांची होती. तर द्वितीय सत्र Subjective पध्दतीची होती. प्रत्येक विषयाची वेळ ही दीड तासाची होती. यामुळे संबंधित तीन तासांच्या सलग दोन परीक्षा द्याव्या लागतील.

एखाद्या विषयामध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना सूट गुण देण्याची तरतूद आहे. या सुविधेचा लाभ या नापास झालेल्या विद्यार्थ्यांना लाभ होत नाही का? दुसऱ्या बाजूने एखादा विद्यार्थी जर क्रीडापटू असेल तर त्याला केवळ थिअरी परीक्षेमध्ये 11 टक्के गुण प्राप्त केल्यास उर्वरीत क्रीडा गुणांच्या आधारावर संबंधित विद्यार्थी पास होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे धोरण मंडळाचे असताना केवळ विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला हा प्रकार कशासाठी? केवळ एका गुणासाठी त्यांना जीवनातील महत्त्वाचे वर्ष वाया घालवावे लागते. याबाबत संबंधित विषयांचे अध्यापन करणारा शिक्षकवर्ग ही सध्या संभ्रमात आहे ?संबंधित शाळा प्रमुखांनी याबाबत शालान्त मंडळाकडे संपर्क साधून चौकशी करून अन्याय दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे पालकांनी मत व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT